घरमुंबईया हॉस्पिटलने केला अवयवदानाचा निर्णय घेणाऱ्या कुटुंबियांचा सत्कार

या हॉस्पिटलने केला अवयवदानाचा निर्णय घेणाऱ्या कुटुंबियांचा सत्कार

Subscribe

अवयवदानाबाबतच्या वाढलेल्या जनजागृतीचा आणखी प्रोत्साहन मिळावे यासाठी ग्लोबल हॉस्पिटलकडून पुढाकार घेण्यात आला आहे.

अवयवदानाबाबतच्या वाढलेल्या जनजागृतीचा आणखी प्रोत्साहन मिळावे यासाठी ग्लोबल हॉस्पिटलकडून पुढाकार घेण्यात आला आहे. अवयवदानाबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी परळच्या ग्लोबल हॉस्पिटलकडून अवयवदानाचा निर्णय घेणाऱ्या चार कुटुंबियांचा सत्कार केला आहे. गरजू रुग्णांना अवयवदान करण्यासाठी लोकांना प्रेरणा देणे हे जागतिक अवयवदान दिनाचे उद्दीष्ट असते. अवयव उपलब्ध नसल्याने भारताने दर वर्षी लाखो मृत्यू होतात. त्यामुळे, अवयवदानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्याबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी परळच्या ग्लोबल हॉस्पिटलने अवयवदानाचा निर्णय घेणाऱ्या चार कुटुंबियांचा सत्कार केला आहे.

अवयवदान ही काळाची गरज आहे. कारण एक अवयवदाता ८ व्यक्तींचे आयुष्य वाचवू शकतो. मृत्यूनंतर आपले अवयव दान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देणे आणि त्याबद्दल जागरुकता निर्माण करणं हे या विशेष दिनाचे उद्दीष्ट आहे. मृत अवयवदात्याने केलेल्या अवयवदानामुळे इतर अनेक रुग्ण नव्याने आयुष्य जगू शकतात.
– डॉ. विवेक तळवलीकर, सीईओ, ग्लोबल हॉस्पिटल

- Advertisement -

भारतात अजूनही अवयवदानाबाबत पुरेशी जनजागृती नसल्याने जर अवयवदानाचा टक्का वाढवायचा असेल तर ग्रामीण आणि शहरी भागात अवयवदानाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. ग्लोबल हॉस्पिटलमधील क्रिटिकल केअर विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत बोराडे म्हणाले, “अवयवदानाबद्दल माहिती नसल्यामुळे त्याबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज आणि भीती आहे. आपण स्वत: अवयवदान केले पाहिजे आणि आपल्या कुटुंबियांना तसंच जवळच्यांना अवयवदान करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. यंदाच्या वर्षी आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये चार ब्रेन-डेड व्यक्तींच्या कुटुंबियांनी मृत व्यक्तीच्या अवयवांचे दान करण्यास मंजुरी दिली. अशाच अत्यंत दु:खाच्या प्रसंगी दुसऱ्या व्यक्तींना जीवनदान देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या कुटुंबियांचा सत्कार करण्यासाठी ग्लोबल हॉस्पिटलतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला.”

हेही वाचा –

Video: विनयभंग झाला नाही, ‘त्या’ महिलेची महाडेश्वरांना ‘क्लिन चिट’

- Advertisement -

घरवापसी; राष्ट्रवादीचे नेते धनराज महाले पुन्हा शिवसेनेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -