घरमुंबईग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीचे दर घसरले; पहा काय आहे किंमत

ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीचे दर घसरले; पहा काय आहे किंमत

Subscribe

सोन्या – चांदीच्या दरात आज, शुक्रवार घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. एचडीएफसी सिक्युरिटीज यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्लीत आज सोन्याचे दर १९१ रुपये प्रती १० ग्रामने कमी झाला. यामुळे आजचा सोन्याचा भाव ५२ हजार ४५२ रुपये प्रती तोळा इतका आहे. गुरुवारी सोन्याचे भाव ५२ हजार ६४३ रुपये प्रती १० ग्रॅम होता. मात्र आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. तर शुक्रवारी चांदीच्या किंमतीत ९९० रुपये प्रती किलोग्रॅममागे घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे चांदीचा दर ६९ हजार ४४१ रुपये प्रती किलोग्रॅम इतका झाला आहे. तर गुरूवारी हा दर ७० हजार ४३१ रुपये प्रती किलोग्रॅम इतका होता.

सध्या पितृपक्षाचा महिना सुरू असून नुकतेच श्रावणातील सण पार पडले. तर पुढील आठवड्यात नवरात्र, दरसा आणि त्यानंतर दिवाळी येणार आहे. अशामध्ये ग्राहकांना सोने खरेदीसाठी चांगली संधी असून सोन्याचा दर कमी होण्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र सोने, चांदीचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर ते गेले आहेत.

- Advertisement -

 हेही वाचा –

संजय राऊत यांनाही धमकीचा फोन; कोलकातामधून एकाला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -