Sunday, August 9, 2020
Mumbai
28.5 C
घर महामुंबई तुतारी एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी खूशखबर

तुतारी एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी खूशखबर

कायमस्वरूपी चार कोच जोडणार

Mumbai

मध्य रेल्वे प्रशासनाने कोकणात जाणार्‍या प्रवाशांसाठी खुशखबर देताना दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसला कायमस्वरूपी आणखी चार डब्यांची जोडणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसला कायमस्वरुपी चार कोची जोडणी सोबतच सोलापुर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस आणि भुसावळ -पुणे एक्सप्रेसला नवीन एलएचबी कोच जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळेस मोठा दिलासा मिळणार आहे.

कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी 11003-04 दादर ते सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस ही नेहमी दादर टर्मिनसहून फलाट क्रमांक 7 वरून सुटते. 11 नोव्हेंबरपासून या एक्सप्रेसला 4 जादा कोच असणार आहेत. त्यामध्ये एसी थ्री टियर आणि स्लीपर क्लासचा प्रत्येकी एक- एक कोच आणि जनरल सेकण्ड क्लासचे दोन कोच असणार आहेत. तसेच 12157-58 पुणे- सोलापुर – पुणे हुतात्मा एक्सप्रेस आणि 11025-26 भुसावळ – पुणे – भुसावळ एक्सप्रेसला नवीन एलएचबी कोच बसविण्यात येणार आहे. 11 नोव्हेंबरपासून एलएचबी कोच असणारी 19 डब्यांची गाडी या मार्गावर धावणार आहे.