घरमुंबईठाणेकरांसाठी खूशखबर...ठाण्यात 'आपला दवाखाना' सुरू

ठाणेकरांसाठी खूशखबर…ठाण्यात ‘आपला दवाखाना’ सुरू

Subscribe

गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावे याकरता आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात 'आपला दवाखाना' सुरु केला आहे. या दवाखान्यात महत्त्वाच्या चाचण्या सुद्धा विनामुल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

आरोग्य तक्रारींसाठी वेळ नसलेले चाकरमानी नेहमीच डॉक्टरकडे जाण्यास टाळाटाळ करत असतात. अशा नेहमीच घाईत असलेल्यांसाठी सरकारच्या योजनेतील ‘आपला दवाखाना’ उपयोगी पडणार आहे. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात ‘आपला दवाखाना’ सुरु केला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या हस्ते या दवाखान्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. रुग्णांना घरा जवळ वैद्यकीय सुविधा मिळावी, या अनुषंगाने ठाण्यात ‘आपला दवाखाना’ सुरू केला आहे. आरोग्याकडे लक्ष द्या असा संदेश आरोग्य विभागाकडून देण्यात येतो. त्यातूनच आपला दवाखानाची संकल्पना समोर आली असून त्याची सुरुवात ठाणे शहरापासून करण्यात आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गरजू रुग्णांसाठी मोहल्ला क्लिनिक ही संकल्पना राबवायला सुरूवात केली आहे. या योजनेला रुग्णांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याच धर्तीवर आता मुंबई आणि ठाण्यात आपला दवाखाना सुरू करण्याचा विचार राज्य सरकारनं केला होता. त्यानुसार आता ठाण्यातील दोन ठिकाणी हा दवाखाना सुरू करण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबईतही सुरु होणार ‘आपला दवाखाना’

यासंदर्भात माहिती देताना राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, ‘‘मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठी रुग्णालयं उभी होत असून फॅमिली डॉक्टरांची संख्या कमी आहे. शिवाय गावखेड्यातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पण मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी घराजवळ आवश्यक वैद्यकीय सोयी-सुविधा नाहीत. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा ठाण्यात आपला दवाखाना सुरू करण्यात आला. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर मुंबईतील प्रत्येक विभागात हा दवाखाना सुरू करण्यात येईल. या दवाखान्याला ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ असं नाव देण्यात आलं आहे.’’

“ठाण्यातील तज्ज्ञ डॉक्टर गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार करतील. महत्त्वाच्या चाचण्या सुद्धा विनामुल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय नोकरदार व्यक्तींचा विचार करून सकाळी आठ ते दहा आणि सायंकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत हा आपला दवाखाना सुरू राहिल.’’ असंही शिंदे यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – विकासक-पालिकेत विसंवाद, 10 महिन्यांपासून दवाखाना बंद

हेही वाचा – मराठमोळ्या डॉक्टरचा सलाम!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -