घरमुंबईआता गुगल मॅप्स सांगणार पब्लिक टॉयलेट कुठे आहे?

आता गुगल मॅप्स सांगणार पब्लिक टॉयलेट कुठे आहे?

Subscribe

ट्रेन आणि बसमधील गर्दीची माहिती देणारं फीचर लाँच केल्यानंतर आता गुगल मॅप्सवर सार्वजनिक शौचालय कुठे आहे? याचीही माहिती मिळणार

ट्रेन आणि बस यांच्या माहितीसह गुगलने काही दिवसांपुर्वी ऑनलाईन हमाल शोधण्यासाठीचे अॅप तयार केले होते. मात्र आता सार्वजनिक शौचालय कुठे आहे? याची देखील माहिती गुगल मॅपवर उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत’ गुगलने ४५ हजार कम्युनिटीसह सार्वजनिक शौचालये गुगल मॅप्सवर अॅड केली असून संपुर्ण देशातील १७०० शहरात असणारे सार्वजनिक शौचालयांची नोंद गुगल मॅप्सवर करण्यात आली आहे.

- Advertisement -

यूजर्सना मिळणार बाइक-शेअरिंग स्टेशनची माहिती

हे वैशिष्ट्य आयओएस आणि अँड्रॉइड अशा दोन्ही डिव्हाइसवर उपलब्ध असून दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी गुगलने एक नवं फीचर आणले आहे. गूगल मॅप्स अॅपवर ‘पब्लिक टॉयलेट्स नीयर मी’ या नावाने हे फीचर असणार आहे. यासोबतच, यूजर्सना बाइक-शेअरिंग स्टेशनची माहिती देखील दिली जाणार आहे. या फीचरच्या मदतीने बाइक उपलब्ध आहेत की नाहीत, याची माहिती यूजर्सना मिळू शकेल. यासाठी गुगलने आयटीओ वर्ल्डसोबत पार्टनरशिप केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -