घरमुंबईगुगल पे मार्फत भारतीयांसाठी महत्वाची घोषणा, युजर्सना मोठा दिलासा

गुगल पे मार्फत भारतीयांसाठी महत्वाची घोषणा, युजर्सना मोठा दिलासा

Subscribe

गुगल पे वापरणाऱ्या भारतीय ग्राहकांना दिलासा देणारी बातमी गुगल इंडियाने जाहीर केली आहे. गुगल पे च्या कोणत्याही व्यवहारासाठी कोणतीही शुल्क आकारणी होणार नाही असे गुगलमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. पण भारतात हा दिलासा देण्यात आलेला असला तरीही अमेरिकेतील गुगल पे वापरकर्त्या ग्राहकांना मात्र हा शुल्क द्यावा लागणार आहे. गुगलने याबाबतची घोषणा करून भारतीय एप वापरकर्त्यांना मोठा दिलासा दिला आहे.

गुगलने गेल्याच आठवड्यात जाहीर केले होते की, येत्या वर्षामध्ये गुगल पे हे नवीन व्हर्जन एंड्रॉईड आणि आयओएस ग्राहकांसाठी आणत आहे. पण आगामी काळात गुगलची वेब ब्राऊजर्सची सेवा सुरू राहणार नाही असेही गुगलने स्पष्ट केले आहे. याआधी गुगल पे च्या इंस्टंट मनी ट्रान्सफरसाठी पैसे आकारले जाणार अशा बातम्या समोर आल्या होत्या. पण आज गुगलने याबाबतचा खुलासा करताना स्पष्ट केले आहे की, गुगल पे मार्फतची ही शुल्क आकारणी केवळ अमेरिकेसाठी मर्यादित असेल. गुगलने याआधी स्पष्ट केल्यानुसार गुगल एप वापरणाऱ्या तसेच गुगल बिझनेस एप वापरणाऱ्यांनाही शुल्क आणि कर आकारणी लागू असेल. गुगल पे एप वापरणारे भारतात ६ कोटी ७० लाख वापरकर्ते आहेत. तर गुगल पे च्या माध्यमातून होणारी उलाढाल ही सप्टेंबर २०१९ च्या अखेरीस ११० अब्ज डॉलर्स इतकी होती.

- Advertisement -

गुगल पे बिझनेसचे एकुण ३० लाख मर्चंट असल्याचे गुगल पे मार्फत याआधी जाहीर करण्यात आले होते. गुगल पे सध्या युपीआय आणि डेबिट तसेच क्रेडिट कार्डसाठी सपोर्ट करते. गुगल पे एपची स्पर्धा सध्या पेटीएम, फोनपे, एमेझॉन पे इंडिया सारख्या एपसोबत आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -