घरमुंबईउल्हासनगरमध्ये जेसीबी लावून लाखो रुपयांच्या फर्निचरची मोडतोड

उल्हासनगरमध्ये जेसीबी लावून लाखो रुपयांच्या फर्निचरची मोडतोड

Subscribe

उल्हासनगरमध्ये एका फर्निचर दुकानदाराच्या दुकानाची जेसीबीने तोडफोड करून दुकानातील लाखो रुपयांचे फर्निचर उध्वस्त करण्यात आले आहे.

एका फर्निचर दुकानदाराच्या दुकानाची जेसीबीने तोडफोड करून दुकानातील लाखो रुपयांचे फर्निचर उध्वस्त करण्यात आले आहे. या दुकानदाराच्या बाजूला असलेल्या दुकानदाराने ही मालमत्ता आपली असल्याचा दावा करून ही तोडफोड केली आहे. या घटनेत आपले २७ लाखांचे नुकसान झाले असून, घटनेला ३ दिवस झाल्यानंतर देखील पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही असे तक्रारदार दुकानदाराचे म्हणणे आहे. उल्हासनगर-३ येथे फर्निचर मार्केटमध्ये नरेश चंदर खटवानी यांचे न्यू राज फर्निचर नावाचे दुकान आहे. दुकानाच्या मागील बाजूस खटवानी यांचे फर्निचरचे गोडाऊन असून येथे तयार फर्निचर आणि फर्निचरचे साहित्य ठेवण्यात आले होते.

अशी केली मोडतोड

सोमवार, १५ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास महेश साधनानी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जेसीबी मशिनच्या सहाय्याने दुकानाची भिंत आणि पत्रे तोडली. त्यानंतर गोडाऊनमध्ये ठेवलेल्या फर्निचर आणि फर्निचरवरून बुलडोजर फिरवला. यात खटवानी यांचे २७ लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची तक्रार त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात केली आहे. कोणत्याही मालमत्तेवर कारवाई करण्याचा अधिकार महानगरपालिकेला असून महानगरपालिका देखील कारवाई करतांना कागदपत्रे बघून आणि नोटीस देऊनच कारवाई करते, असे असताना एखादा व्यक्ती मध्यरात्रीला येतो आणि कोणाची मालमत्ता उध्वस्त करतो. या व्यक्तीला ना मनपाचे भय आहे, ना पोलिसांचे, असा आरोप खटवानी यांनी केला. माझ्याकडे या जागेचे सर्व कागदपत्रे उपलब्ध असून मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, अशी माहिती यांनी खटवानी यांनी पत्रकारांना दिली.

- Advertisement -

पोलिसांत तक्रार दाखल 

ही घटना घडल्यानंतर सकाळी खटवानी हे मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गेले असता तेथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली आणि त्यांना बाहेर जाण्यास सांगितले आणि जेव्हा मी बोलावेल तेव्हाच या असे उर्मटपणे सांगितले. दोन तास खटवानी हे पोलीस ठाण्याच्या बाहेर उभे होते. मात्र त्यांना आत बोलावलेच नाही, असा आरोप त्यांनी केला. या संदर्भात मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र कोते यांना विचारले असता ते म्हणाले की आम्हाला प्रांत कार्यालय उल्हासनगर येथून पत्र मिळाले आहे, की ज्या जागेवर बुलडोझर फिरवला आहे ती मालमत्ता महेश साधनानी नावाच्या व्यक्तीची असून त्यावर अतिक्रमण झालेले आहे. ते तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त द्यावा, असे त्या पत्रात नमूद केले आहे. मात्र आम्ही पोलीस बंदोबस्त दिलेला नाही. कोणी सर्वसामान्य नागरिक एखाद्याच्या मालमत्तेत घुसून असा बुलडोजर फिरवू शकतो का, असे कोते यांना विचारले असता ते म्हणाले खटवानी आणि साधनानी या दोघांच्या जागेबाबतची कागदपत्रे बघून आम्ही पुढील कारवाई करू. काल सायंकाळी पोलिसांनी खटनानी यांची तक्रार नोंदवली आहे. मात्र अद्याप मोहन साधनानी आणि त्याच्या साथीदारांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -