घरमुंबईमूर्तीच्या उंचीवरून सरकारमध्ये गोंधळ, लालबागच्या राजावरून वाढतोय संभ्रम

मूर्तीच्या उंचीवरून सरकारमध्ये गोंधळ, लालबागच्या राजावरून वाढतोय संभ्रम

Subscribe

सरकारचा हा सर्व खटाटोप केवळ लालबागच्या राजाकरताच ?

मुंबई शहर तसेच उपनगरांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायांची मूर्तीची उंची कमी करून अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करण्याची तयारी दर्शवलेली असतानाच सरकारमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. सरकारने पुन्हा एकदा सर्व गणेशोत्सव मंडळांकडून त्यांचे अभिप्राय जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. सरकारमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्यानेच अद्याप त्यांच्याकडून नियमावली जाहीर केली जात नाही. परंतु सरकारचा हा सर्व खटाटोप केवळ लालबागच्या राजाकरताच असल्याचे बोलले जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरे करू, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व सार्वजनिक उत्सव मंडळांच्या समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना केले. परंतु मुंबईमध्ये बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती तसेच उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने यंदा हा उत्सव साधेपणाने साजरा करताना मूर्तीची उंची कमी करण्याची तयारी दर्शवली आहे.

- Advertisement -

त्यानुसार यंदा उंच मोठ्या गणेश मूर्तीऐवजी ३ ते ५ फुटांचीच मूर्ती बनवण्यावर सर्व मंडळांचे एकमत होत आहे. त्यामुळे सर्व मंडळांनी यंदा गणेश मूर्तींची उंची कमी करण्याची तयार दर्शवूनही सरकार याबाबत ठोस निर्णय घेताना दिसत नाही.

यंदा मुंबईतील सर्वच गणेशोत्सव मंडळांनी साधेपणोन उत्सव साजरा करतानाच मूर्तीची उंची कमी करण्यासही तयारी दर्शवली. शहरासह उपनगरांतील सर्वच मंडळांनी याला सहमती दर्शवली होती. याबाबत आम्ही सरकारकडे मंडळांची बाजूही मांडली होती. सरकार जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल किंबहुना तो बंधनकारक असेल. त्यामुळे सरकारने याबाबत ठोस निर्णय घ्यावा. सरकारकडून निर्णय घेतला जात नसल्याने एकप्रकारे मंडळांमध्ये व मूर्तिकारांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. किमान हा निर्णय घेतल्यास उत्सव मंडळे कामाला लागतील.

– अॅड नरेश दहिबावकर, अध्यक्ष (बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समिती)

केवळ लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने बनवण्यात येणारी पुजेची मूर्ती ही मोठ्या आकाराची असते. त्यामुळे शासनाने जर पाच फुटांच्या आत मूर्ती बनवल्यास ‘लालबागच्या राजा’ची मूर्तीचाही आकार कमी करावा लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने ‘लालबाग राजा’ वगळता इतर मंडळांसाठी नियमावली लागू केल्यास त्यामुळे वादही निर्माण होवू शकेल. त्यामुळे यातून सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न सरकारच्यावतीने सुरु असून याकरताच उत्सवाकरता नियमावली व ठोस निर्णय घेतला जात नसल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोठ्या उंचीच्या मूर्ती बनवल्या जाणार नाही असा निर्णय मूर्तिकार संघटनेनेने यापूर्वीच घेतला आहे. अनेक मंडळांच्या पुजेच्या मूर्ती या पावणे चार फुटांच्या असतात. गणेश गल्लीतील मंडळांची एकच मूर्ती असते. ही मूर्ती सव्वा चार फुटांची असते. त्यामुळे यापेक्षा अधिक उंचीची एकही मूर्ती बनवली जाणार नाही,असा निर्णय आहे. त्यामुळे यंदा कोणतीही मूर्ती पाच फुटांच्या वर बनवली जाणार नाही,अशा प्रकारचा निर्धार सर्वच मूर्तिकारांनी केला आहे. कारण जेवढी मोठी मूती असेल तेवढी ती उचलायला माणसे जास्त लागतील.

त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीकोनात हा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे. त्यामुळे कोणत्याही मंडळाची मोठ्या उंचीची मूर्ती बनवली जाणार नाही, असे बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष गजानन तोंडवळकर यांनी सांगितले.

यंदा कोणतीही मूर्ती पाच फुटांच्या वर बनवली जाणार नाही, अशा प्रकारचा निर्धार सर्वच मूर्तिकारांनी केला आहे. कारण जेवढी मोठी मूती असेल तेवढी ती उचलायला माणसे जास्त लागतील. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर हा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीकोनात हा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे. त्यामुळे कोणत्याही मंडळाची मोठ्या उंचीची मूर्ती बनवली जाणार नाही.
-गजानन तोंडवळकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघ.


Corona: धाकधूक वाढली! कल्याण डोंबिवलीने नवी मुंबई, ठाण्यालाही टाकलं मागे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -