चारा छावणीच्या तक्रारींची चौकशी, मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

चारा छावणीमधील कथित घोटाळ्याची चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

uddhav thackeray press conference
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील अनेक चारा छावणी प्रकल्पाबाबत तक्रारींची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्याबद्दल बुधवारी पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यामुळे या वाढत्या तक्रारींची चौकशी करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रीमडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

राज्य मंत्रीमंडळाची बैठक बुधवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चारा छावणी संदर्भात अनेक तक्रारींचा उल्लेख केला. बीडमधून चारा छावणीबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बीडसह राज्यातील ज्या ठिकाणाहून चारा छावणीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांची चौकशी आता लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.