घरमुंबईमहापालिकेत फेलो उमेदवारांना ७५ हजारांचे मानधन

महापालिकेत फेलो उमेदवारांना ७५ हजारांचे मानधन

Subscribe

मुख्यंमंत्र्यांच्या फेलोशिप कार्यक्रमाच्या धर्तीवर महापालिकेत पथदर्शी प्रकल्प राबवून मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्प कामांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत प्रकल्प गतीने राबवण्यासाठी १५ फेलोशिप उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

राज्यातील विकास प्रक्रिया आणि निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांना मिळावा, त्यातून समाजसेवा करण्यासाठी सुजाण नागरिक तयार व्हावेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी फेलोशिप कार्यक्रम जाहीर केला. या अंतर्गत मुंबई महापालिकेत १५ उमेदवारांची कंत्राटी तत्वावर नेमणूक करण्यात येत आहे. या कंत्राटी उमेदवारांना महिन्याला प्रत्येकी ७५ हजार रुपये एवढे मानधन दिले जात आहे. मुख्यंमंत्र्यांच्या फेलोशिप कार्यक्रमाच्या धर्तीवर महापालिकेत पथदर्शी प्रकल्प राबवून मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्प कामांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत प्रकल्प गतीने राबवण्यासाठी १५ फेलोशिप उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, या फेलोशिपला बुधवारी झालेल्या गटनेत्यांच्या सभेत मंजुरी देण्यात आली.

१५ जागांसाठी १११ अर्ज

महापालिकेच्या विविध खात्यांचा दैनंदिन कामकाज प्रक्रीया, कामकाजादरम्यान विविध घटकांचा ताळमेळ साधणे, काम गतीमान होण्यासाठी पाठपुरावा करणे इत्यादीकरता महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर महत्वाच्या खात्यांसाठी एकूण १५ फेलो उमेदवारांची कंत्राटी पध्दतीने नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त यांच्यासह विविध खात्यांमध्ये या फेलो उमेदवारांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारने फेलोशिपअंतर्गत कुठेही कामाचा १ वर्ष किंवा अधिक कालावधीचा अनुभव असलेल्या आणि पदवीधर असलेल्या फेलो उमेदवारांना दरमहा प्रत्येकी ७५ हजार रुपये एवढे कंत्राट वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे ११ महिन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. या १५ जागांसाठी जाहिरातीद्वारे मागवलेल्या अर्जांमध्ये एकूण १११ अर्ज प्राप्त झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – …तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा – उद्धव ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -