घरमुंबईमुंबईचं पाणी स्वच्छ तर दिल्लीचं अस्वच्छ!

मुंबईचं पाणी स्वच्छ तर दिल्लीचं अस्वच्छ!

Subscribe

मुंबईतील पाणी देशात अव्वल ठरले असताना देशाची राजधानी दिल्लीमधील पाणी मात्र सर्वात अस्वच्छ ठरले आहे. ज्या शहरांमध्ये महापालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जातो. त्याच शहरांमधील पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली आहे.

पाणी म्हणजे जीवन. पण शहरी भागांमधील पाण्याच्या गुणवत्तेवर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. पण या गोष्टीला अपवाद ठरत आहे मुंबईचं पाणी. केंद्र सरकारने देशातील २१ राज्यांच्या राजधानीतील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर आधारित रँकिंग जारी केली आहे. या रँकिंगमध्ये मुंबई अव्वल ठरली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री राम विलास पासवान यांनी ही रँकिंग जारी केली आहे. मुंबईतील पाणी देशात अव्वल ठरले असताना देशाची राजधानी दिल्लीमधील पाणी मात्र सर्वात अस्वच्छ ठरले आहे. ज्या शहरांमध्ये महापालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जातो. त्याच शहरांमधील पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली आहे.

दिल्लीतील पाणी पिण्यास अयोग्य

देशातील राज्यांच्या राजधानी शहरांमधील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता समोर आल्यानंतर राम विलास पासवान यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “या रँकिंगमधून कोणालाही दोष द्यायचा नाही. नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं या हेतूनेच हे रँकिंग करण्यात आलं. दरम्यान देशभरातून पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी येत होत्या. या रँकिंगमध्ये मुंबईचं पाणी सर्वात स्वच्छ ठरलं असून दिल्लीतील पाणी पिण्यालायक नसल्याचं तपासात समोर आलं आहे.”

- Advertisement -

शहरांची क्रमवारी

  • मुंबई
  • हैदराबाद
  • भुवनेश्वर
  • रांची
  • रायपूर
  • अमरावती
  • शिमला
  • चंदीगड
  • त्रिवेंद्रम (तिरुवअनंतपुरम)
  • पाटणा
  • भोपाळ
  • गुवाहाटी
  • बंगळुरू
  • गांधीनगर
  • लखनौ
  • जम्मू
  • जयपूर
  • देहरादून
  • चेन्नई
  • कोलकाता
  • दिल्ली

अशी ठरवली पाण्याची गुणवत्ता

१० मानकांच्या आधारे पाण्याची शुद्धता आणि गुणवत्ता निश्चित करण्यात आली. यावेळी पाण्यातील आर्सेनिक सारख्या धोकादायक रसायनाचं प्रमाणसुद्धा लक्षात घेण्यात आलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -