स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटीवरील बंदोबस्त वाढवला

स्वातंत्र्यदिन, १५ ऑगस्टच्या निमित्ताने महत्त्वाच्या शहरांमधील पोलीस बंदोबस्त आणखीनच चोख करण्यात आला आहे.

Mumbai
सीएसएमटीमध्ये बंदोबस्त

स्वातंत्र्यदिन, १५ ऑगस्टच्या निमित्ताने महत्त्वाच्या शहरांमधील पोलीस बंदोबस्त आणखीनच चोख करण्यात आला आहे. मुंबईमधील अतिदक्षता परिसरात जागोजागी पोलीस, सीआरपीएफ जवान यांच्याद्वारे चेकिंग केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वरही मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले असून रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सिक्युरिटीच्या सहाय्याने तपासणी केली जात आहे. उद्या, १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन असल्या कारणाने त्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही घातपात घडू नये यासाठी जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

यापूर्वीच बकरी ईद आणि स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशात दहशतवाद्यांकडून घातपात घडवण्याचा कट असल्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबईपुणेदिल्लीसह १५ शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला. आसाममधील गुवाहाटीमध्येही रेल्वे स्थानकांवर स्निफर डॉग्जच्या मदतीने चेकिंग केले जात आहे. 

तसेच जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पहिल्यांदा १५ ऑगस्ट साजरा केला जात असून त्या पार्श्वभूमीवर जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.