घरमुंबईदहीहंडीत ६१ गोविंदा जखमी; २६ रुग्णालयांतून ३५ जणांना डिस्चार्ज

दहीहंडीत ६१ गोविंदा जखमी; २६ रुग्णालयांतून ३५ जणांना डिस्चार्ज

Subscribe

दिवसभरातील दहीहंडीच्या थरारात जवळपास ६१ गोविंदा जखमी झाले आहेत.

मुंबईत शनिवारी सकाळपासूनच दहीहंडीच्या उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालं. पण, उंचच उंच थर रचण्याच्या नादात  अनेक गोविंदा जखमी झाले होते. दिवसभरातील दहीहंडीच्या थरारात जवळपास ६१ गोविंदा जखमी झाले आहेत. मुंबईतील तिनही पालिका आणि सरकारी हॉस्पिटल्स जखमी गोविंदावर उपचार करण्यासाठी सज्ज असून परळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये संध्याकाळपर्यंत एकूण २० जखमी गोविंदा दाखल झाले होते. त्यापैकी, तीन गोविंदांना हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करुन घेतले आहेत. शिवाय या गोविंदांमध्ये १४ वर्षाखालील गोविंदांचाही समावेश आहे.


हेही वाचा – असे आहे, कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याचे महत्त्व!

काळाचौकीच्या एका पथकातील १२ वर्षीय विघ्नेश संजय काटकर या बालगोविंदाच्या डोक्याला जबर मार बसला आहे. तसंच, वरळीच्या उदय क्रिडा मंडळमधील २० वर्षीय अनिकेत सुधीर सुतार या गोविंदाच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. तर, ४१ वर्षीय सुनील प्रभाकर सावंत हे श्री साई देवस्थान गोविंदा पथकातील असून यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. शिवाय, त्यांना पक्षाघात आला असल्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. या तिघांवरही सध्या केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांना अतिदक्षता विभागात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रायगडमध्ये २५ वर्षीय गोविंदाचा मृत्यू


आतापर्यंत ६१ गोविंदा जखमी

तसंच, नायर हॉस्पिटलमध्ये २ गोविंदावर उपचार सुरू असून एका गोविंदाच्या नाकाला फ्रॅक्चर झालं असून दुसऱ्या गोविंदाच्या हाता-पायाला फ्रॅक्चर असल्याची माहिती नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे. शिवाय, या दोन्ही गोविंदावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सायन हॉस्पिटलमध्येही दोन गोविंदावर उपचार करुन सोडण्यात आलं असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर, जे.जे या सरकारी हॉस्पिटलमध्ये मानसी हरेश भोईर ही १७ वर्षांची महिला गोविंदा जखमी अवस्थेत दाखल झाली असून हिच्या डाव्या पायाला जबर मार बसला आहे. हिच्यावर ओपीडीमध्ये उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -