घरमुंबईपगारवाढीसाठी बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

पगारवाढीसाठी बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

Subscribe

बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे आणि अत्यल्प वेतवाढीकडे लक्ष वेधण्यासाठी बॅंक कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने आजपासून दोन दिवस बॅंकांचं कामकाज बंद ठेवण्यात आलं आहे. यामुळे देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांमधील कामकाज दोन दिवस ठप्प राहणार आहे. हे आंदोलन मे महिन्याच्या शेवटी होत असल्याने पगारालाही विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खातेदारांना आपले व्यवहार ऑनलाइन आणि एटीएमद्वारे करावे लागणार आहेत. मात्र एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस, कोटक महिंद्रा या सारख्या खासगी बँकांचे व्यवहार नियमितपणे सुरु राहणार आहेत.

४८ तासांचे आंदोलन

बँकांमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वेतनाचा दर पाच वर्षांनी आढावा घेतला जातो. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्समध्ये नऊ संघटना एकत्रित आल्या आहेत. या आंदोलनात जलद वाटाघाटीतून लवकरात लवकर पगारवाढीच्या प्रश्नावर करार करण्यात यावा, पगारात पुरेशी वाढ करावी, यासह अन्य मागण्यासांठी हे काम बंद आंदोलन केले जात आहे. आज सकाळी साडेसहा वाजेपासून हे आंदोलन सुरु झाले असून ४८ तास हे आंदोलन सुरु राहील.

- Advertisement -

एटीएमध्ये पैशांचा खडखडाट?

या आंदोलनामुळे बँकेचे कुठलेही आर्थिक व्यवहार होणार नसून ग्राहकांची गैरसोय होऊ नये याकरता एटीएममध्ये पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध करुन देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. असे असले तरी बॅंका बंद असल्याने काही तासांमध्येच एटीएमध्ये पैशांचा खडखडाट होण्याची शक्यता आहे. देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांमधील तब्बल १० लाख कर्मचारी या काम बंद आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा संघटनेतर्फे करण्यात आला आहे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -