घरमुंबईमुंबई पुणे एक्सप्रेसवर ग्रीन कॉरिडर

मुंबई पुणे एक्सप्रेसवर ग्रीन कॉरिडर

Subscribe

सात सेंद्रीय कचरा विघटन केंद्र उभारण्यात येणार

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर वाढणार्‍या वाहनांची आणि प्रवाशांची वर्दळ पाहता ग्रीन कॉरिडॉरची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून एक पर्यावरण पुरक उपक्रम एमएसआरडीसीमार्फत हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सेंद्रिय कचरा विघटन केंद्राच्या (ओडब्ल्यूसी) उभारणीला सुरुवात करण्यात आली आहे. द्रुतगती मार्गादरम्यान महामंडळातर्फे सात सेंद्रिय कचरा विघटन केंद्रांची उभारणी केली जाणार आहे.

95 किमी अंतराच्या मुंबई-पुणे दुतगती मार्गावर महामंडळातर्फे फुडमॉल, पेट्रोल पंप, ट्रक टर्मिनल यासारख्या वे-साइड मेनिटीज उभारण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षात द्रुतगती मार्गावरील वाहतुकीस प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. वाहने आणि प्रवाशांची ही वाढती संख्या लक्षात घेता या वे-साइड मेनिटीज असलेल्या ठिकाणांवर प्रचंड प्रमाणात सेंद्रिय कचर्‍याची निर्मिती होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे द्रुतगती मार्गादरम्यान सात ठिकाणी सेंद्रिय कचरा विघटन केंद्रांची (ओडब्ल्यूसी) तर सहा ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची (एसटीपी) उभारणी केली जात आहे. यातील पहिल्या कचरा विघटन केंद्राचे उद्घाटन शनिवारी झाले.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने कायमच पर्यावरणाला पोषक ठरेल, अशा सुविधांची उभारणी केली आहे. सेंद्रिय कचरा विघटन आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र हे महामंडळाच्या आजपर्यंतच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे ठरावेत. पुढील 20 वर्षांचा विचार करुन या केंद्रांची निर्मिती करण्यात येत आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले. सेंद्रिय कचरा विघटन केंद्रात तयार झालेल्या या कम्पोस्ट खतांचा वापर द्रुतगती महामार्गादरम्यान वृक्षलागवडीसाठी होऊ शकतो. तसेच द्रुतगती मार्गादरम्यान उघड्यावर कचरा पडून निर्माण होणार्‍या रोगराईला आळा बसण्यास मदत होणार आहे. ग्रीन कॉरिडॉरची निर्मिती करणे, हे शासनाचे धारेण आहे. त्या अनुषंगाने एचपीसीएल कंपनीच्या ऑटो केअर सेंटरमध्ये सीएनजी केंद्राचे उद्घाटनही आज पार पडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -