घरमुंबईडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Subscribe

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवी मुंबई, ठाण्यात ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महापालिकेच्या विद्यमाने कोर्ट नाका येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास महाराष्ट्र राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र फाटक, महापौर नरेश गणपत म्हस्के, उप महापौर पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर तथा नगरसेविका मिनाक्षी राजेंद्र शिंदे, माजी महापौर संजय मोरे, नगरसेवक सुधीर कोकाटे, नगरसेवक राजेंद्र साप्ते, माजी नगरसेवक पवन कदम आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी राजे भोसले, फुले, शाहू, आंबेडकर प्रतिष्ठान आधुनिक भारत परिवार,संविधान सन्मान अभियान, रिपाइं (ए) आयोजित सुनिल खांबे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार 5 डिसेंबर 2019 रोजी रात्री 12 वाजता ठाणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजसेवक दिपक निकाळजे यांची उपस्थिती होती. यावेळी हजारो अनुयायांनी कोर्टनाका ते ठाणे स्टेशन परिसरात बाबासाहेब यांना अभिवादन केले. तसेच रात्री 10 ते 12 या वेळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्वरांजली हा भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला.

- Advertisement -

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात अ‍ॅम्फी थिएटर येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर येथे अभिवादन करण्यासाठी नवी मुंबईतून पुढे जाणार्‍या नागरिकांकरीता नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सीबीडी बेलापूर येथील उड्डाणपुलाखाली सायन पनवेल महामार्गावर सुविधा कक्ष उभारून त्याठिकाणी चहापान व्यवस्था करण्यात आली होती. त्याठिकाणीही अभिवादन करण्यात आले. चैत्यभूमीकडे अभिवादन करण्यासाठी नवी मुंबईतून पुढे जाणार्‍या नागरिकांनी मोठ्या संख्येने या सुविधा कक्षाला भेट दिली. अशाच प्रकारची व्यवस्था सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ठिकाणीही करण्यात आली होती.

याप्रसंगी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, स्थायी समिती सभापती नवीन गवते, सभागृह नेते रविंद्र इथापे, माजी महापौर तथा नगरसेवक सुधाकर सोनवणे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील व महावीर पेंढारी, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किरणराज यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, शहर अभियंता सुरेंद्र पाटील, मुख्य लेखा परीक्षक दयानंद निमकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार, परिमंडळ 1 चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, मु्ख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -