घरमुंबईजीआरपीची हेल्पलाईन आली धावुन, महागडे सोने परत मिळाले

जीआरपीची हेल्पलाईन आली धावुन, महागडे सोने परत मिळाले

Subscribe

मुंबई : रेल्वेतुन प्रवास करत असताना बर्‍याचदा आपण आपल्या वस्तु नकळत विसरुन उतरतो पण त्या परत मिळतील शाश्वती नसते. मात्र जीआरपीच्या हेल्पलाईनमुळे एका महिलेला रेल्वेत विसरलेले ६ तोळे परत मिळाले आहे. त्या महिलेसाठी जीआरपीची १५१२ ही हेल्पलाईन एखाद्या दूताप्रमाणे ठरली आहे.

आशा शिंदे या महिला मानसरोवर या स्थानकाहून चेंबुरला जात होत्या. त्यांनी सीएसएमटीची लोकल पकडली होती. त्यांच्या बागेत ६ तोळे सोने होते. ती बॅग आशा शिंदे लोकलमध्येच विसरल्या. चेंबूरला उतरल्यावर आपण आपली बॅग विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने जीआरपी हेल्पलाईन १५१२ वर संपर्क साधला आणि आपली तक्रार नोंदवली.

- Advertisement -

वडाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस शिपाई सोनवणे यांनी तक्रार ऐकून घेतल्यानंतर ताबडतोब कुर्ला येथे ड्युटीवर असणार्‍या पोलीस शिपाई ठाकूर, बक्कल क्रमांक ३५२४ यांना वायरलेसवरुन संदेश दिला. त्यानुसार तात्काळ प्रसंगवधान दाखवत मानसरोवरहून सीएसएमटीच्या दिशेने जाणार्‍या लोकलमध्ये ठाकुर चढले आणि आशा शिंदे यांची हरवलेली बॅग महिला डब्यातून ताब्यात घेतली. बॅगेतील सोने सुखरूप होते.

वडाळा पोलीस ठाण्यात आशा शिंदे यांना त्यांची बॅग सुखरुपणे देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस शिपाई ठाकूर आणि जीआरपीच्या हेल्पलाईनचे सध्या कौतुक होत आहे.

- Advertisement -

बर्‍याचदा आपला महत्वाचा ऐवज आपण विसरल्यानंतर पोलीस ठाण्यात जावून तक्रार नोंदवतो. मात्र तो परत मिळण्याची शक्यता कमीच असते. पण तात्काळ तक्रार नोंदवण्यासाठी जीआरपी हेल्पलाईनसुद्धा आहे. त्यावर संपर्क साधला तर लगेच शोध घेणे सोपे होते. त्यामुळे प्रवाशांनी हेल्पलाईनचा जास्तीतजास्त वापर करावा
-अजित बारटक्के, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वडाळा जीआरपी पोलीस स्टेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -