घरमुंबईडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, जीटी हॉस्पिटलमधील प्रकार

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, जीटी हॉस्पिटलमधील प्रकार

Subscribe

मुंबईतल्या पालिकेच्या जी टी रुग्णालयामध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेंच मृत्यू झाल्याचा आरोप मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

सीएसएमटी येथील जी. टी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ४५ वर्षीय रघुनाथ भाऊ कुळेकर या रुग्णाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. गिरगावमधील फणसवाडीध्ये राहणाऱ्या रघुनाथ कुळेकर यांना हृदयविकाराचा झटका आला. पण, डॉक्टरांनी वेळेत योग्य उपचार न दिल्यामुळे कुळेकर यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईक केला आहे.

रघुनाथ कुळेकर यांचा पुतण्या शशी कुळेकर यांनी सांगितलं की, “जी टी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे काकांचा मृत्यू झाला. त्यांना छातीत दुखत होतं. तरीही डॉक्टरांनी दोन तास तसंच थांबवून ठेवलं. सामान्य उपचार देऊन त्यांना तसंच थांबवून ठेवलं होतं. त्यांचा ईसीजी काढला तो देखील नॉर्मल असल्याचं सांगण्यात आलं. त्यांना आम्ही सांगितलं की, सीनियर डॉक्टरांना बोलवा पण, त्यांनी काही ऐकलं नाही. त्यानंतर ते बोलले आम्ही प्रयत्न करत आहोत. जर त्यांनी आधीच सांगितलं असतं तर आम्ही त्यांना दुसरीकडे हलवलं असतं. त्यामुळे कदाचित काका वाचले असते. त्यांना कसलाच त्रास नव्हता. शिवाय, निर्व्यसनी असल्यामुळे त्यांना कसलाच त्रास आहे असं जाणवलं नाही. याविषयी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील करण्यात आली आहे. त्यांचं पोस्टमार्टम केल्यानंतर कळेल नेमकं काय झालं होतं.”

याविषयी जीटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकुंद तायडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – 

उपचारावेळी मृत्यू झाल्याने रुग्णाच्या नातेवाइकांचा उद्रेक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -