घरमुंबईगुटखा बंदी नावापुरतीच

गुटखा बंदी नावापुरतीच

Subscribe

सर्व्हे काय सांगतो?
ग्लोबल ऍडल्ट टोबॅको सर्व्हे २०१७ (गेट्स) च्या अहवालानुसार, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जवळपास अडीच कोटी लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. त्यात दोन कोटी लोक तोंडावाटे तंबाखू सेवन करणारे तर ४० लाख धूम्रपान करणारे आहेत. जवळपास 70 टक्के नागरिकांना तोंडाच्या आजारांबद्दल माहीतच नसतं. त्यामुळे आपण तंबाखू, गुटखा अशा पदार्थांची सवय लावून घेतो. यातूनच तोंडाचा कर्करोग होतो. ज्यामुळे बर्‍याचदा रुग्णांच्या तोंडाची शस्त्रक्रिया करावी लागते. आपल्या महाराष्ट्रात तंबाखूमुळे होणार्‍या तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण ८० टक्के आहे. यात ४० टक्के पुरूषांना कर्करोग होतो. तर, ३० टक्के हे महिलांचे प्रमाण आहे. तर, १० टक्के हे महाविद्यालयीन मुलांचे प्रमाण आहे. तंबाखू नियंत्रणामध्ये महाराष्ट्र सरकार आघाडीवर आहे. तरुण पिढीचे तंबाखूपासून संरक्षण करण्यावर सरकारचा भर आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस
राज्य सरकारने गुटखा उत्पादन आणि विक्रीवर बंदी आणली आहे. मात्र आज महाराष्ट्रात सहज गुटखा उपलब्ध होत असून त्यांची उघड्यावर विक्री सुद्धा सुरु आहेत. याचे सगळ्यात जास्त प्रमाण मुंबईच्या रेल्वे स्थानकांबाहेर दिसून येत आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसच्या बाहेर खुले आम गुटखाविक्री होत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे सरकारची गुटखाबंदी केवळ कागदावरच असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. पोलीस आणि एफडीए यांचं या प्रकाराकडे दुर्लक्ष होतंय. मुंबई शहरात झोपडपट्ट्या, मोठी रेल्वे स्टेशन्स परिसरात खुलेआम गुटखाविक्री होतेय. प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करून किंवा अर्थपूर्ण व्यवहार करून गुजरात, मध्यप्रदेश इथून गुटखा आणला जातोय. गुटखा विक्रेते माणूस पाहून गुटखा विकत आहेत. राज्यात हा गुटखा कसा येतो. त्याची खुलेआम विक्री कशी केली जाते आणि अशी विक्री होत असतानाही त्यावर कोणाची

- Advertisement -

कुर्ला रेल्वे स्थानक
महाराष्ट्र शासनाने गुटखा व पानमसाल्यावर बंदी घातली आहे. मात्र आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात आणि रेल्वे स्थानकात खुलेआम गुटखा विक्री केली जाते. मध्य रेल्वेच्या महत्वपूर्ण स्थानका पैकी एक कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर गुटखा विक्री केली जाते. विशेष म्हणजे कुर्ला रेल्वे स्थानकाच्या बाहेर मुंबईतील सगळ्यात स्वस्त गुटखा विकल्या जातो. या दुकानापासून काही अंतरावर जीआरपी आणि आरपीएफ पोलीस ठाणे आहे. स्टेशन बाहेरून मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांचेही अनेक अधिकारी येत जात असतील . त्यांना ही गुटखा विक्री दिसली नाही का, की अर्थार्जनासाठी त्यांचीही इथे डोळेझाक सुरू आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे. असत प्रवासांकडून बोलण्यात येत आहेत.

चर्चगेट रेल्वे स्थानक गुटखा विक्री
पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात पानटपरीवाल्यानी पाय पसरवले आहे. आज चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेरील येथील महत्त्वाच्या भागात खुलेआम गुटखाविक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. राज्यात गुटखाबंदीचा कायदा लागू झाला असतानाही चर्चगेट रेल्वे स्थानक तसेच विशेष म्हणजे, हा गुटखा दुप्पट ते तिप्पट दराने ग्राहकांना विकला जात आहे. हा सर्व प्रकार भरदिवसा घडत असतानाही यावर अन्न व औषध प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस आणि अन्न आणि औषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थिती होत आहे.

- Advertisement -

काय होते कारवाई ?
गुटखा विक्री करणार्‍यांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मात्र सध्या गुटखा विक्री करणारा सापडला तर त्याच्यावर तात्काळ 328 गुन्हा दाखल करून त्याचे सर्व पुरावे जमा जप्त करून ते त्याचे नुमने घेतले जातात आणि त्यात जर तो दोषी आढळल्यास त्याच्यावर तात्काळ 328 दाखल करून झाल्यास त्याला 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आली. तसेच गुटखा विक्रेत्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून, गुटखा विक्रेत्यांवर अदाखल पात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, त्याला अजून राष्ट्रपतींची परवाणगी येणे बाकी असून, हा कायदा आला तर गुटखा विक्रेते पूर्ण बंद विक्री थांबवतील असा विश्वास अन्न व नागरिक पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी बोलून दाखवला. तसेच व्यसनमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सरकार विक्रेत्यांचे प्रबोधन देखील सतत करत असते

रेल्वे जनरल डब्यात सुद्धा गुटखा विक्री
आज महाराष्ट्रतील अनेक रेल्वे गाड्यातील जनरल डब्यात गुटखा विक्री केली जात आहे. याबद्दल तक्रारी सुद्धा रेल्वे प्रशासनकडे येत आहे. तरी सुद्धा आज या जनरल डब्यात विकेले जाणार्या गुटखा वर बंदी घालण्यात रेल्वे प्रशासनाला अपयश आले आहे. महाराष्ट्रासह केरळ, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार या राज्यांनी गुटखाबंदी घातली आहे. तरी सुद्धा गुटखा व्यापारी व दलालांनी मुसक्या आवरल्या गेल्या नाही. आज अबला महिला व बालकामगारांना अवैध व्यापारात गोवण्यात येत आहे. रेल्वे गाड्यातून बेकायदा गुटख्याची आयात करून तालुक्यातील खेडोपाडी पोहचवणार्‍या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाला हे रोखण्यात यश येत नाही.रेल्वे बजेटद्वारे रेल्वे गाड्यांमध्ये सुरक्षा, स्वच्छता आणि सोशल मीडीयाचा वापर त्यांना विशेष महत्व देण्यात आले आहे. तथापि रेल्वे गाड्यातुन चालणार्‍या गुटखा विक्रीवर आता पर्यत रेल्वेला बंद घालता आली नाही.

महाराष्ट्रातील दोन लाख लोकांना तोंडाच्या कर्करोगाची भीती
राज्याच्या आरोग्य विभागाकडून तोंडाच्या आरोग्यासाठी राबवलेल्या शिबिरात सर्वात जास्त तोंडाच्या आजाराने त्रस्त असलेले रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील २.१४ कोटी रुग्णांची तपासणी करण्यात आली. या तपास मोहिमेत २ लाख ६२ हजार ४३१ लोकांना तोंडाच्या कर्करोगाची पूर्वलक्षणे आढळली आहेत. तर, त्यापैकी महाराष्ट्रातील ५४४ रुग्ण तोंडाच्या कर्करोगाचे आढळले आहेत. या मोहिमेतील डॉक्टर आणि काही अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तंबाखूचं सेवन सोडलं नाही तर येत्या १० ते १२ वर्षांत तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण आणखी वाढतील आणि हे देशासमोरील खूप मोठं संकट असेल.

दीड वर्षांत पाच कोटींचा गुटखा जप्त
महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंखाखू व सुगंधित सुपारीची विक्री करण्यावर कायदेशीर बंदी आहे. असे असले तरी मुंबईतील विविध ठिकाणी गुटखा, पान मसाला यांची छुप्या पद्धतीने विक्री होत असते. अन्य राज्यातून आलेला गुटखा व पान मसाल्याची गोदामांमध्ये साठवणूक होऊन मग तो शहरातील विविध भागात पोचवण्यात येतो. अशी साठवणूक करण्यात येणारी गोदामे व छुप्या पद्धतीने विक्री करणार्‍या दुकानदारांवर एफडीएने दीड वर्षात तब्बल 311 वेळा कारवाई केली आहे. एप्रिल 2017 ते मार्च 2018 दरम्यान एफडीएने मुंबईत विविध ठिकाणी 160 वेळा कारवाई करून चार कोटी एक लाख 28 हजार 462 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला. तर एप्रिल 2018 ते ऑगस्टपर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक म्हणजेच 152 वेळा कारवाई केली आहे. यात 85 लाख 51 हजार 719 रुपयाांचा माल जप्त करण्यात आला, अशी माहिती एफडीएचे (अन्न) सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली.

वर्ष       कारवाई        जप्त माल (रुपयांमध्ये)
2017    160            4,01,28,462
2018    15२            85,51,719
एकूण     311            4,86,80,181

गुटखाविरोधात विशेष मोहीम
गुटखा, पान मसाला, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखूची विक्री करणार्‍यांविरोधात एफडीएने विशेष मोहीम राबवली होती. यासाठी नेमलेल्या 18 पथकांनी नळबाजार, भायखळा, नागपाडा, माझगाव, कामाठीपुरा, महालक्ष्मी व दहिसर येथे कारवाई करून मोठ्या प्रमाणात माल जप्त केला. त्याखालोखाल अंधेरी, वांद्रे, दादर, चेंबूर, कुर्ला, कांदिवली, बोरिवली, भांडुप, मुलुंड येथे कारवाई केली.

आज रेल्वेच्या जनरल डब्यात गुटखाविक्री सुरु आहेत. ही विक्री करणारे बहुतांश गुटाका विक्रेता हे रेल्वे मार्गावरील लगच्या गाव खेड्यातील असतात. गुटखा विक्रीवर राज्य शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने त्याचा फटका सामान्यांना लोकांना बसत आहे.
हर्षा शहा – रेल्वे प्रवासी ग्रुप पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -