घरमुंबई'त्या' कंपनीच्या संचालकपदी गुटखाकिंग दीपक कोठारी

‘त्या’ कंपनीच्या संचालकपदी गुटखाकिंग दीपक कोठारी

Subscribe

घाटकोपरमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. ते विमान गुटखाकिंग दीपक कोठारी यांच्या मालकीचे असल्याची माहिती समोर येत आहे. या कंपनीच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत.

घाटकोपरमध्ये गुरूवारी झालेल्या अपघातात ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र ज्या यु वाय विमान कंपनीचे हे विमान होते, त्या कंपनीने आतापर्यंत कोणताच खुलासा केलेला नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानंतर यु वाय कंपनीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान यासंबंधी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. घाटकोपरच्या जीवदया लेन येथे झालेल्या चार्टर्ड विमानाच्या अपघातासंदर्भात आता नागरी विमानवाहतूक महासंचालनालय (DGCA)ने चौकशी सुरू केली आहे. अपघातग्रस्त विमान हे यु वाय एव्हीएशन कंपनीच्या मालकीचे असल्याचे समोर आले. या यु वाय एव्हीएशन कंपनीच्या संचालक पदावर गुटखाकिंग दीपक कोठारी आणि उदय कोठारी असून त्यांच्या कंपनीसंदर्भात काही खळबळजनक माहिती समोर आली आहे.

मुलगा उदयदेखील संचालकपदी

दीपक कोठारी यांनी यु वाय ही कंपनी ११ मे २०१५ साली सुरू केली. त्यांच्यासह त्यांचा मुलगा उदय कोठारी हे दोघेही या कंपनीमध्ये संचालक पदावर कार्यरत होते. तर उमंग त्रिवेदी हे ७ ऑगस्ट २०१५ साली कंपनीच्या सहसंचालकपदी रुजू झाले. या कंपनीचा रजिस्टर नंबर २६४३१९ हा असून विलेपार्ले पश्चिमेतील ९/१०सुखशांती, सीएचएस आरडी ८, प्लॉट नंबर ६५ जेव्हीपीडी स्किम हा या कंपनीचा पत्ता दाखवण्यात आला आहे.

- Advertisement -

कंपनीच्या ताफ्यात हेलिकॉप्टरचा समावेश

२०१५ पासून अस्तित्वात आलेल्या या कंपनीच्या ताफ्यात सुपर किंग एअर बी २०० (SUPER KING AIR B 200) हे एअर क्राफ्ट आणि बेल २३० (BELL 230) हे हेलिकॉप्टर आहे. अपघातग्रस्त झालेले सी ९० (C90) हे चार्टर्ड विमान लवकरच त्यांच्या ताफ्यात येणार असल्याची माहिती यु वाय एव्हीएशनकडून त्यांच्या संकेतस्थळावर देण्यात आली होती. परंतू, त्याआधीच गुरुवारी चाचणी दरम्यान या विमानाला अपघात झाला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -