घरमुंबईतर या नाकर्त्या सरकारला बांगड्यांचा आहेर करू; दिव्यांग सेनेचा निर्धार

तर या नाकर्त्या सरकारला बांगड्यांचा आहेर करू; दिव्यांग सेनेचा निर्धार

Subscribe

दिव्यांग सेनेकडून भांडूपमधील शिवाजी तलाव येथे दिव्यांगांच्या न्यायासाठी 'भिख मांगो' उपोषण करण्यात आले. यावेळी सरकारवर दिव्यांगांवरील डावलण्याच्या कृतीवर हल्लाबोल करण्यात आला.

दिव्यांग सेनेकडून भांडूपमधील शिवाजी तलाव येथे दिव्यांगांच्या न्यायासाठी ‘भिख मांगो’ उपोषण करण्यात आले. यावेळी सरकारवर दिव्यांगांवरील डावलण्याच्या कृतीवर हल्लाबोल करण्यात आला. ‘भिख मांगो’ उपोषण दिव्यांग सेना मुंबई उपाध्यक्ष रश्मी कदम यांचा पुढाकाराने घेण्यात आला होता. पत्रकारांची बोलताना रश्मी कदम म्हणाल्या, ‘शिवसेना-भाजप सरकारने दिव्यांगांसाठी काय केले? या शिवसेना-भाजप सरकारने महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांना रोजगार किती दिला? १ ऑक्टोबर २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांकडून दिव्यांग पेंशनमध्ये दिव्यांगांना भिख टाकण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दिव्यांग या भाजप-शिवसेना सरकारवर खूप नाराज आहेत.

दिव्यांगांवर भिख मागण्याची वेळ

पुढे त्या म्हणाल्या, आज दिव्यांगांना भिख मागण्याची वेळ या शिवसेना -भाजपाचा सरकारने आणली आहे. दिव्यांगांच्या मागण्या बृहन्मुंबई महानगरपालिका, इतर महानगरपालिका, नगरपरिषद आणि महाराष्ट्र सरकारने पूर्ण न केल्यास भिख मांगो आंदोलन असेच चालू राहील, याची शिवसेना-भाजप सरकारने नोंद घ्यावी, आसे रश्मी कदम यांनी ठणकावून सांगितले. जर २ डिसेंबर २०१८ पर्यंत दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर या भाजप-शिवसेना सरकारला जागे करण्यासाठी दिव्यांग सेनेतर्फे बांगड्यांचा आहेर येत्या ३ डिसेंबर रोजी “जागतिक दिव्यांग दिना” निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना भेट देण्यात येईल. शिवाय महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा आणि गावातून महिला दिव्यांगांनाही मी रश्मी कदम स्वतः दिव्यांग असून सर्वांना आव्हान करते की, आपण ही बांगड्यांचा आहेर या सरकारला पाठवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान, दिव्यांग सेनेचे अध्यक्ष प्रसाद साळवी, सरचिटणीस रोहन सातार्डेकर यांनी ‘भिख मांगो’ उपोषणला हजेरी लावली. मुंबई अध्यक्ष मोहन गुरव, ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज सातोसे, रेहाना कुरेशी ठाणे जिल्हा सरचिटणीस, दिलीप कांबळे, अनिल शिगंणे, वैभव निळेकर, अमित जैस्वाल हेदेखील उपोस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -