घरमुंबईकरोनाने विक्रोळी-भांडुपकरांना खिंडीत गाठले

करोनाने विक्रोळी-भांडुपकरांना खिंडीत गाठले

Subscribe

रुग्णवाहिका सेवा आणि शौचालयांचे सॅनिटायझेशन अभावी जनता हैराण

भांडुप आणि विक्रोळी या दोन विधानसभा मतदार संघांमध्ये मोडणार्‍या महापालिकेचा एस विभाग हा कोरोनाबाधितांच्या यादीत सुरुवातीपासून बरेच अंतर ठेवून होता. परंतु भांडुपच्या खिंडीपाड्यातून सुरु झालेल्या या संसर्गाने पुढे भांडुपसह विक्रोळीकरांना खिंडीत गाठायला सुरुवात केले. त्यामुळे सध्या या दोन्ही विधानसभा क्षेत्रांमध्ये रुग्ण दरवाढीची टक्के पहिल्या पाच क्रमांकामध्ये दिसून येत आहे. परंतु एवढ्या मोठ्या या विभागाला अवघ्या तीनच रुग्णवाहिका असून या रुग्णवाहिका सेवा आणि दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टी चाळींमध्ये असलेल्या सार्वजनिक शौचालयांमध्ये प्रमाणशीर सॅनिटायझेशन होत नसल्याने येथील जनता हैराण झालेली आहे.

भांडुपमधील खिंडीपाडा,कोकण नगर, उत्कर्ष नगर, काजू टेकडी, रुक्मिणी नगर तसेच विक्रोळीतील कन्नमवार नगर, टागोर नगरसह कांजूर पूर्व आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारेानाबाधितांचे हॉटस्पॉट तयार होत आहे. आतापर्यंत या या विभागात एकूण बाधित रुग्णांची संख्या बुधवारपर्यंत १७८६ एवढी झाली असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. तर आतापर्यंत १०० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. भांडुप परिसरात दाटीवाटीने वसलेल्या मोठ्या झोपडपट्ट्या आता तर त्यातुलनेत विक्रोळी,कांजूरमार्ग हा झोपडपट्टी व इमारती असा मिश्र वस्तीचा परिसर आहे. त्यामुळे भांडुपसह विक्रोळीतील दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालयांचे सॅनिटायझेशन प्रभावी होताना दिसत नाही.

- Advertisement -

सध्या या केवळ ३ रुग्णवाहिका आहेत. परंतु या रुग्णवाहिका १९१६वरून नियंत्रित केल्या जातात. त्यामुळे विभागात एखादा रुग्ण असल्यास, विभागाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनाही यावरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे बर्‍याचदा चांगल्या रुग्णाला नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होतात व चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांसाठी वेळीच उपलब्ध होत नाही. वैद्यकीय अधिकार्‍यांनाही १९१६वर संपर्क साधून रुग्णवाहिका उपलब्ध करून घ्यावी लागते. परिणामी बर्‍याच वेळा चिंताजनक असलेल्या रुग्णांना वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही आणि वैद्यकीय अधिकारी हतबल होवून हे सर्व पाहत असतो. त्यामुळे प्रशासनाने किमान वैद्यकीय अधिकार्‍यांच्या एनओसीशिवाय विभागातील रुग्णवाहिकेचा वापर करू नये. तसेच केल्यास चिंताजनक असलेल्या रुग्णांना वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध होवू शकतात.

येथील शुश्रुषा रुग्णालय महापालिकेने ताब्यात घेऊन त्यांना मासिक ९८ लाख रुपये देत आहे. याठिकाणी १४० खाटांपैकी १०० खाटा महापालिकेच्या ताब्यात असल्या तरी रुग्णालय केवळ ४०ते ५० खाटांशिवाय कुणालाही प्रवेश देत नाही. आणि सध्या त्या रुग्णालयात ५० हजार रुपये अनामत भरल्याशिवाय रुग्णांना दाखल करतच नाही.
-उपेंद्र सावंत, स्थानिक नगरसेवक, शिवसेना.

- Advertisement -

किमान विधानसभा निहाय क्वारंटाईन केंद्र तसेच आरोग्य केंद्र उभारायला हवीत. शौचालयांची स्वच्छता ही दिवसांतून एकदा होत असून महापालिकेबरोबर आम्हीही खासगी पध्दतीने शौचालयांचे सॅनिटायझेशन करून घेत असतो.
-सारीका पवार, स्थानिक नगरसेविका,भाजप.

रुग्णवाहिका हीच प्रमुख समस्या असून राजावाडी किंवा खासगी रुग्णालयांमध्ये दाखल केले होते. परंतु खाटांचीही कमरता भासते. येथील क्रॉम्प्टनच्या जागेत ७ ते ८ हजार क्षमतेचे क्वारंटाईन सेंटर उभारले जावू शकते. त्यामुळे याचा प्रस्ताव मी प्रशासनाला दिला आहे.
-सुवर्णा करंजे, स्थानिक नगरसेविका, शिवसेना.

रुग्णाला योग्य वेळी खाट उपलब्ध न झाल्याने तसेच एकाला व्हेंटीलेटर्स उपलब्ध न झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या भागात रुग्ण आढळून आल्यानंतर घरांचे आणि सार्वजनिक शौचालयांचे सॅनिटायझेशन केले जाते. तसेच सार्वजनिक शौचालयांचे सॅनिटायझेन आठवड्यात दोनदा केले जाते.
-वैशाली पाटील, स्थानिक नगरसेविका,भाजप.

सुरुवातीला प्रशासन सर्व सुविधा देत असली तरी येथील जनतेमध्ये जनजागृती झाली असून स्वत:हून मंडळे व संस्था पुढे येवून काम करत आहेत. जनता स्वत: काळजी घ्यायला लागली. शौचालयांचे सॅनिटायझेन दिवसांत एकदा होते.
-उमेश माने, स्थानिक नगरसेवक, शिवसेना.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -