ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत

रे रोड स्थानकावर ओव्हेरहेड वायर तुटल्यामुळे हार्बर रेल्वे वाहतूक मार्ग विस्कळीत झाले होते. तब्बल ४५ मिनिटांनी रेल्वे वाहतूक सुरु झाली.

Mumbai
harbor line closed overhead wire breaks near re road railway station
ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत

हार्बर रेल्वे वाहतूक मार्गावर संध्याकाळी ६ वाजेच्यादरम्यान रे रोड स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प झाली. रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचा प्रचंड मनस्तापाला सामरे जावं लागलं. संध्याकाळी ऐन कामावरुन सुटण्याच्यावेळी लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे चाकरमाण्यांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, प्रवाशांनी रेल्वे पटरीमार्गे पायी चालणं पसंत केले. अखेर ६ वाजून ४५ मिनिटांनी हार्बर रेल्वे वाहतूक पून्हा सुरु झाली. परंतु, यामुळे संपूर्ण लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यामुळे सध्या हार्बर मार्गावरील सर्व गाड्या उशिराने धावत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here