घरमुंबईVideo : गढूळ पाण्यात धुतली जात आहे भाजी

Video : गढूळ पाण्यात धुतली जात आहे भाजी

Subscribe

भांडूप रेल्वे स्थानकाच्या परिसरात गढूळ पाण्यात भाजी धुत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या दादरमधील क्रांतिसिंह नाना पाटील मंडईमध्ये पायांनी गाजरे धुतली जात असल्याचा व्हिडीओ गेल्या महिन्यात ‘व्हायरल’ झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ही घटना भांडूप रेल्वे स्थानकाच्या परिसरातील असल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओत भाजीपाला विक्रेते रस्त्यावरील वाहत्या गढूळ पाण्यात भाजी धुवत असल्याचे दिसत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

- Advertisement -

धक्कादायक बाब

धक्कादायक गोष्ट म्हणजे या परिसरात रस्त्याखाली शौचालयाचे चेंबर आहे. त्यामुळे या चेंबरमधून निघणारे ड्रेनेजचे पाणीही या गढूळ पाण्यात मिसळते आणि त्याच पाण्यात भाजी विक्रेत्यांकडून भाजीपाला धुतला जात असल्याचे स्पष्टपणे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा भाजी विक्रेत्यांवर पालिका कारवाई करणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.


हेही वाचा  – आता गाजर धुण्यासाठी यंत्राचा वापर!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -