धक्कादायक: आजारपणाला कंटाळून हवालदाराची आत्महत्या

Mumbai
suicide
प्रातिनिधिक फोटो

अनेक दिवसांपासून उच्च रक्तदाब अर्थात हाय ब्लड प्रेशरमुळे त्रस्त असलेले हवालदार सूर्यकांत नेमाने यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास त्यांनी गोरेगावमधली त्यांच्या राहत्या घरी बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांनी सुईसाईड नोट देखील लिहिल असून त्यामध्ये आपण आजारपणामुळे आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे. नेमाने यांचं वय ४५ वर्षे असून त्यांच्या मागे आई आणि दोन मुलं असा परिवार आहे. गेल्या वर्षभरापासून नेमाने यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे ते नैराश्यामध्ये गेले होते.

परिसरातल्या डॉ. शेट्टी यांच्याकडे ते उपचार घेत होते. मात्र, नैराश्यामध्ये गेल्यामुळे आजारपणाचा त्रास सहन न झाल्याने त्यांनी अखेर गुरुवारी स्वत:चं आयुष्य संपवून घेतलं. त्यांनी बेडरूममध्ये स्वत:ला कोंडून घेत दुपारी साडेतीनच्या सुमारास पंख्याला गळफास घेतला. त्यावेळी त्यांची आई आणि दोघे मुलं हॉलमध्ये होते. जेव्हा त्यांच्या मुलाने बेडरूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दरवाजा आतून बंद असल्याचं त्याच्या लक्षात आलं. वारंवार वाजववल्यानंतरही नेमानेंनी दरवाजा न उघडल्यामुळे अखेर मुलांनी दरवाजाचा लॅच तोडला. तेव्हा नेमानेंनी आत्महत्या केल्याचं समोर आलं.