घरमुंबई८ रेल्वे स्थानकांवर लागणार हेल्थ चेकअप एटीएम मशीन

८ रेल्वे स्थानकांवर लागणार हेल्थ चेकअप एटीएम मशीन

Subscribe

लोकमध्ये प्रवास करण्यार्‍यासाठी खुशखबर

मध्य आणि पश्चिम रेल्वेचा उपनगरीय मार्गांवरुन प्रवास करणार्‍या 80 लाख प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेकडून रेल्वे प्रवाशांच्या आरोग्य तपासणीसाठी चक्क 8 रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक हेल्थ चेकअप एटीएम मशीन बसविण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. या हेल्थ चेकअप एटीव्हीएमच्या माध्यमातून प्रवाशांना फक्त 50 रुपयांत 18 प्रकारच्या आरोग्य चाचण्या अवघ्या 5 ते 6 मिनिटांत करता येतील. तसेच या आरोग्य तपासणीचा अहवाल सुध्दा प्रवाशांच्या मोबाईलवर तत्काळ उपलब्ध होणार आहे.

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्यासाठी रेल्वे स्थानकांवर आपात्कालीन वैद्यकीय कक्ष उभारले आहेत. तसेच रेल्वे स्थानकांजवळ रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे. आता याच पाठोपाठ रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या आरोग्य तपासणीसाठी अत्याधुनिक हेल्थ चेकअप एटीएम मशीन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

मध्य रेल्वेच्या कल्याण, एलटीटी आणि ठाणे या तीन तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट,मुंबई सेंट्रल, दादर,अंधेरी आणि बोरिवली रेल्वे स्थानकावर या अत्याधुनिक हेल्थ चेकअप एटीएम मशीन बसविण्यात आली आहेत. याचे कंत्राट योलो हेल्थ या कंपनीला देण्यात आला आहे. या हेल्थ चेकअप एटीएम मशीनच्या माध्यमातून तब्बल 16 ते 18 प्रकारच्या आरोग्य तपासण्या होणार आहेत. रक्त तपासणी, प्रवाशांचे वजन, उंची, रक्तदाब, शुगर, किडनी फंक्शन सारख्या 18 प्रकारच्या तपासणी करण्यात येणार आहेत.

असे असणार शुल्क?

या हेल्थ चेकअप एटीएम मशीनजवळ दोन ट्रेंड पॅरामेडिकल स्टाप तैनात असणार, प्रवाशांना हेल्थ चेेकअपसाठी मदत करणार आहे. या मशीनच्या माध्यमातून प्रवाशांचे रक्त तपासणी,वजन, उंची, ब्लडपेशर, शुगर, किडणी फंक्शन सारख्या 18 प्रकारच्या तपासणी करण्यात येणार आहेत. याचे शुल्क दोन प्रकारे आहे. 16 प्रकारच्या तपासणीसाठी 50 रूपये आकारण्यात येणार आहेत. तर 18 प्रकारच्या आरोग्य तपासणीसाठी 100 रुपये प्रवाशांकडून आकारण्यात येतील, तसेच मशिनवर आरोग्य चाचणी झाली की, फक्त 10 मिनिटांत आरोग्य तपासणीचा अहवाल प्रवाशांना मिळणार आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -