घरमुंबईकेईएममध्ये सुरू करणार हार्ट फेल्यूअर क्लिनिक

केईएममध्ये सुरू करणार हार्ट फेल्यूअर क्लिनिक

Subscribe

मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये हृदयावर योग्य उपचार आणि निदान व्हावं यासाठी हार्ट फेल्यूअर क्लिनिक सुरू केलं जाणार आहे.

मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये लवकरच हार्ट फेल्युअर क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. ज्यामुळे रुग्णांच्या हृदयात असणारे दोष आणि ज्यांना हृदय प्रत्यारोपणाची गरज असते अशा रुग्णांची नोंद ठेवणं शक्य होणार आहे.

बदललेल्या जीवनशैलीमुळे, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आजारही बळावले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात सर्वात जास्त असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढलं आहे. हायपरटेंशन, डायबिटीस, धूम्रपान, दारुचं व्यसन आणि बदललेली जीवनशैली या सर्वातून आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या हृदय या अवयवावर परिणाम होत असून याचं स्वरुप ही बदललेलं आहे.

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर, मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये हृदयावर योग्य उपचार आणि निदान व्हावं यासाठी हार्ट फेल्यूअर क्लिनिक सुरू केलं जाणार आहे. काही जणांना थोडं चाललं तरी दम लागतो. दरम्यान, हृदयावर ताण येतो. पंपिंग अॅक्शन २० टक्क्यांवर येते. त्याचा परिणाम शारिरीक हालचालींवर होतो. अनेकदा यातून हृदय प्रत्यारोपण करणं हा पर्याय असतो.

हार्ट फेल्युअर क्लिनिकमुळे हृदयाच्या प्रत्यारोपणासाठी प्रतिक्षायादीत असलेल्या रुग्णांची नोंद ठेवणे शक्य होईल. शिवाय, त्यांना नेमके कशाप्रकारचे उपचार किंवा निदान करायचे आहेत, यावर लक्ष केंद्रीत करणे सोपं होईल. हृदयविकार आणि सर्जरी या विभागातील डॉक्टर्स या विभागात समाविष्ट करुन घेतले जाणार आहेत.

- Advertisement -

हार्ट फेल्युअर किंवा हृदयाचे कार्य मंदावत जाणे हा हळूहळू गंभीर स्वरूपाचा आजार होतो. यात हृदयाचे स्नायू कमकुवत होत जातात आणि कालांतराने कडक बनतात. असे झाल्याने त्यांची रक्ताभिसरण करण्याची क्षमता कमी होत जाते. यामुळे शरीराच्या महत्वाच्या अवयवांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात पोहोचू शकत नाहीत.

याविषयी अधिक माहिती देताना केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितलं की, ” हार्ट फेल्युअर क्लिनिकअंतर्गत ज्यांना हृदयाची गरज आहे अशा रुग्णांची नोंद ठेवणं सोपं जाईल. त्यासोबतच, त्यांची हृदयासंबंधी कशापद्धतीने उपचार देता येईल यासाठी प्रयत्न केले जातील. रुग्णांना अनेकदा आजाराबाबत माहितीच नसते. त्यामुळे हार्ट फेल्युअर क्लिनिक फायद्याचं ठरेल. “

हृदयासंबंधी असलेल्या आजारांबाबत रुग्णांना माहित नसतात. हृदयाचा आकार वाढणे, त्याचा परिणाम पायांवर होणे अशा आजारांबाबत लोकांना या क्लिनिक अंतर्गत माहिती आणि प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं ही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -