घरमुंबईमुंबईत हाय टाईडची शक्यता; या वेळी उसळणार उंच लाटा

मुंबईत हाय टाईडची शक्यता; या वेळी उसळणार उंच लाटा

Subscribe

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतसह उपनगर आणि कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपून काढले आहे. आजही मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुपारी १ च्या सुमारास समुद्रामध्ये साधार ४.६७ मीटर इतक्या उंचच्या उंच लाटा उसळण्याचीही शक्यताही मुंबई महापालिकेच्या वतीने सांगण्यात आली आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गुजरातच्या काही शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच आजही या भागांमध्ये पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

- Advertisement -

ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, भिवंडी परिसरात रात्रभर पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. काल रात्री ८.३० ला तब्बल १३२ मिमी पावसाची नोंद हवामान खात्याने केली होती.

- Advertisement -

हेही वाचा –

शंभर शास्त्रज्ञांचा दावा; हवेमार्फत पसरतो कोरोना! WHO कडे संशोधनाची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -