घरताज्या घडामोडीMumbai Rain: मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, नागरिकांनो घरातच थांबा!

Mumbai Rain: मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, नागरिकांनो घरातच थांबा!

Subscribe

'सर्वांनी घरातच थांबावं', आदित्य ठाकरेंचं मुंबईकरांना आवाहन!

मुंबईत सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. सकाळपासूनच मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सखल भागात पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. याचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. तर हवामान खात्याने पुढील २४ तासात रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबावे असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत हे आवाहन केलं आहे

“सर्वांनी घरातच थांबावं अशी विनंती आहे. मुंबईत वारा आणि मुसळधार पाऊस सुरु आहे. माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी सुरक्षित रहावे. खासकरुन पत्रकारांनी सुरक्षित रहावे अशी विनंती आहे. जिथे असाल तिथेच थांबा”.

- Advertisement -

त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी देखील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. “मुंबईकरांनी घरातच थांबावं अशी आमची विनंती आहे. महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका. सर्वांनी काळजी घ्या आणि समुद्रकिनारी किंवा पाणी भरलेल्या परिसरात जाऊ नका. गरज लागल्या १०० नंबरवर फोन करा. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा,” असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.

- Advertisement -

जनजीवन विस्कळीत

मुसळधार पाऊस तसंच चर्चगेट, मुंबई सेंट्रल आणि मरिन लाइन्स ते चर्नी रोड दरम्यान ट्रॅकजवळ झाडांच्या फांद्या असल्याने विशेष ट्रेन सेवा मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान तात्पुरती बंद करण्यात आली आहे. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तसंच पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील सीएसएमटी-वाशी आणि सीएसएमटी-कुर्ला दरम्यानची रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.

तीन ते चार दिवस अशीच परिस्थिती

सकाळी ८.३० ते ५.३० दरम्यान कुलाबा वेधशाळेत २२.९ सेमी तर सांताक्रूझमध्ये ८.८ सेमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या ताशी ७० किमी वेगाने वारे वाहत असून पुढील तीन ते चार तास परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -