मुंबई, ठाण्यात पावसाचं दमदार पुनरागमन; विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

heavy rain lashesh in mumbai

विदर्भात पूरस्थिती निर्माण करणाऱ्या पावसाने गेले काही दिवस मुंबई, ठाण्याकडे पाठ फिरवली होती. मात्र आज सकाळी पावसाने दमदार पुनरागमन केलं आहे. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे गेले काही दिवस गर्मीने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई, ठाण्यात जुलै-ऑगस्टमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली होती. मात्र, मागील ४-५ पावसाने दांडी मारली. यामुळे तापमानात वाढ झाल्याचं दिसून आलं. मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी लोक उकाड्याने त्रस्त होते. पावसाच्या पुनरागमनाने काहीसा दिलासा मिळाला आहे. पहाटे साडेचार ते पाच वाजताच्या सुमारास ढगांचा गडगडाटा आणि विजांचा कडकडाटासह पाऊस सुरू झाला. सुरूवातीला पावसाचा जोर कमी होता. त्यानंतर मात्र, वाढतच गेला.