घरमुंबईकर न भरल्याने हेलिकॉप्टर सील, तर वाधवा ट्रेड सेंटरची जलजोडणी कापली

कर न भरल्याने हेलिकॉप्टर सील, तर वाधवा ट्रेड सेंटरची जलजोडणी कापली

Subscribe

महापालिकेने आता कराच्या वसूलीसाठी कंबरकसली आहे. कर वसूलीसाठी आता धडक कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणार्‍या मालमत्ता कराची वसूलीसाठी आता धडक कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. जुहूमधील मेस्को एअरलाईन्स कंपनीच्या हेलिकॉप्टर उभ्या करण्यात येणार्‍या जागेच्या मालमत्ता कराची रक्कम न दिल्यामुळे अखेर या कंपनीची दोन्ही हेलिकॉप्टर महापालिकेच्यावतीने सील करण्यात आली आहेत. या कंपनीकडून महापालिकेला ११ कोटी रुपयांची रक्कम अपेक्षित आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणार्‍या मालमत्ता करातून यावर्षी सुमारे ६,७६८ कोटींचा महसूल अपेक्षित आहे. तर चालू आर्थिक वर्षात ५,०१६ कोटींचा महसूल अपेक्षित होता. त्यापैकी डिसेंबरपर्यंत केवळ १,८१० कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला होता. परंतु त्यानंतर मालमत्ता विभागाच्या सहायक आयुक्त संगीता हसनाळे यांनी युध्दपातळीवर मोहिम राबवून १५ फेब्रुवारीपर्यंत हा आकडा ३ हजारांच्या आसपास नेवून ठेवला. मात्र, मालमत्ता विभागाच्या भार उपायुक्त विजय बालमवार यांच्याकडून काढून घेत सहआयुक्तपदाचा रमेश पवार यांच्या खांद्यावर सोपवण्यात आला. तेव्हापासून कर वसूलीमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे रमेश पवार यांनी सर्व विभाग कार्यालयांच्या अधिकार्‍यांची बैठक घेवून त्यांना कर वसूलीचे लक्ष्य दिले आहे. त्यामुळे सहायक आयुक्त संगीता हसनाळे यांच्या नेतृत्वाखाली कर वसूलीसाठी धडक कारवाई हाती घेतली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – एलईडींनी उजळली बोरीवलीच्या चंदावरकर रोडवरील वाहतूक बेटे

के/पश्चिम विभाग कार्यालयातील करनिर्धारण आणि संकलन विभागाच्या अधिकार्‍यांनी जुहूमध्ये २५ फेब्रुवारी २०२० मध्ये तपासणी करून मालमत्ता कराची भरणा न करणार्‍या मेस्को एअरलाइन्स कंपनीचे दोन हेलिकॉप्टर सील केले आहेत. या कंपनीने हेलिकॉप्टर उभ्या केलेल्या जागेची मागील वर्षांपासूनची ११ कोटी रुपयांच्या कराची भरणा केली नव्हती. त्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यानंतर पाण्याची जोडणी कापण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली. परंतु त्यानंतरही त्यांनी कराची भरणा न केल्यामुळे या कंपनीची दोन्ही हेलिकॉप्टर सील करण्यात आल्याची माहिती संगीता हसनाळे यांनी दिले आहेत. तर एच पूर्व विभागातील वाधवा ट्रेड सेंटरचे तब्बल १८ कोटी रुपयांची कराची थकबाकी होती. सन २०१३ पासूनची ही थकबाकी होती. महापालिकेने नोटीस पाठवल्यानंतर ३ कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शवली. परंतु मागील ७ वर्षांची थकबाकी असल्याने अखेर महापालिकेच्या एच/पूर्व विभागाच्या करनिर्धारण व संकलन विभागाच्यावतीने यावर धडक कारवाई करत वाधवा ट्रेड सेंटरचे जलजोडणी कापण्यात आल्याची माहितीही हसनाळे यांनी दिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -