घरमुंबईवडापाव विकून पूरग्रस्तांना मदत

वडापाव विकून पूरग्रस्तांना मदत

Subscribe

सकाळ पासून दुपारपर्यंत तब्बल ८०० वडापाव विकले गेले असून नागरिकांचा भरगोस प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया वडापाव व्यावसायिकाने दिली.

सामाजिक बांधिलकी जपत एका वडापाव दुकानदाराने एका दिवसाच्या व्यवसायातून येणारे पैसे हे पूरग्रस्तांना देण्याचे ठरवले आहे. दुपारी ३.३० पर्यंत तब्बल ८०० वडापाव या दुकानदाराचे विक्रीला गेले असून या स्तुत्य उपक्रमाला नागरिक देखील भरपूर प्रदिसाद देत आहेत. अभिजित जाधव असे वडापाव दुकानदाराच्या मालकाचे नाव असून त्यांचे थेरगाव परिसरात जाधव वडेवाले म्हणून गाडी आहे. थेरगाव सोशल फाउंडेशन मार्फत हे वडापाव व्यावयायिक मदत करत आहेत. आज त्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करताच नागरिक वडापाव घेण्यासाठी गर्दी केली आहे.

काय म्हणाले ‘जाधव वडेवाले’चे मालक?

‘जाधव वडेवाले’चे मालक अभिजित जाधव म्हणाले की, ”तेथील नागरिकांना मदतीची गरज आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून हे समाजकार्य करत आहेत. ते आज अडचणीत आहेत त्यांना मदत हवी आहे. त्यामुळे आजचे येणारे सर्व पैसे पूरग्रस्तांना देणार आहे. सकाळ पासून दुपारी ३.३० पर्यंत तब्बल ८०० वडापाव विकले गेले आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीला करण्यात आलेल्या आवाहनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रात्री ९ वाजेपर्यंत दुकान उघडे असेल. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाला मोठ्या संख्येने पाठबळ द्यावी, जेणे करून आपण सर्व पूरग्रस्तांची मदत करू,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

- Advertisement -

हेही वाचा – पूरग्रस्तांना मदत; मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री देणार महिन्याभराचा पगार!


विविध स्तरातून पूरग्रस्तांना मदत

कोल्हापूर, सांगली आणि सातारा या परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार माजवल्याने पूराच्या पाण्यात लाखो नागरिक हे बेघर झाले आहेत. तेथील पूरपरिस्थिती आवाक्यात आली असून येथील मानवी जीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे. पाऊस थांबला असून पुराचे पाणी ओसरत आहे. आता येथील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील लाखो नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत असून सर्व स्तरातून नागरिकांना आर्थिक, कपडे, औषधे आणि अन्नाच्या माध्यमातून मदत केली जात आहे. त्यात पिंपरी-चिंचवड देखील मागे नाही. थेरगाव येथील जाधव वडेवाले यांनी एका दिवसाचे येणारे पैसे हे सांगली येथील वाळवा या गावातील पूरग्रस्त नागरिकांना देणार असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -