घरमुंबईकरोनात घोडपदेव बेरोजगार प्रतिष्ठानची स्थापना

करोनात घोडपदेव बेरोजगार प्रतिष्ठानची स्थापना

Subscribe

तरुणवर्गाकडून बेरोजगार कुटुंबियांना मदत

लॉकडाऊनमध्ये घोडपदेवच्या काही तरुणांच्या नोकर्‍या केल्या. मोकळा वेळ भरपूर होता. त्यातच करोनाच्या संकटकाळात गोरगरीब, गरजू कुटुंबियांच्या उपयोगी यावे म्हणून काही बेरोजगार तरुण एकत्र आले. त्यांनी घोडपदेव बेरोजगार प्रतिष्ठानची स्थापना केली. हे तरूण विभागातील नागरिकांना आणि गोरगरीब कुटुंबियांना “ना नफा ना तोटा” अशा स्वरूपात धान्य आणि भाजीपाला विक्री सुरू केली. त्यामुळे गोरगरीब कुटुंबियांना या उपक्रमाचा मोठा फायदा होत आहे. तसेच या बेरोजगार तरुणांचे सर्वत्र कौतुकही होत आहे.

घोडपदेवला राहणारा ऋषिकेश गोलतकर उर्फ जॉन्टी एका गॅरेजमध्ये काम करायचा. लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने तो घरी होता. त्याच्या अनेक मित्रांच्या लॉकडाऊन काळात नोकर्‍या गेल्या आहेत. या सर्व मित्रांना गोलतकर याने एकत्र केले. त्या सर्वांनी मिळून घोडपदेव बेरोजगार प्रतिष्ठानची स्थापना केली आणि समाजसेवेला सुरुवात केली. आज हे तरूण २५ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू जसे तूरडाळ, साखर, तांदूळ,. गहू, कडधान्य आणि भाजीपाला “ना नफा ना तोटा” अशा स्वरूपात गोरगरीब नागरिकांना उपलब्ध करून देत आहेत.

- Advertisement -

असा आहे उपक्रम
दररोज सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी १२ वाजेपर्यत घोडपदेवच्या सुभाष लेनमध्ये ऋषिकेश गोलतकर आणि त्यांचे मित्र स्टॉल लावतात. त्यावरून २५ प्रकारची कडधान्य आणि भाजीपाला विक्री करतात. तसेच जे फोनवर ऑर्डर देतात त्यांना तो माल घरपोच दिला जातो. या कामात ऋषिकेशबरोबर किशोर घाडगे, अनिल मिश्रा, किरण तांबोळी, भरत सिंग, अशोक पाष्टे आणि विजय मोरे मदत करतात. बाजरातून माल घेऊन येण्यापासून ते पॅकिंग कारण्यापर्यंत सर्व काम ही मंडळी करतात.

गेल्या दोन महिन्यांपासून आमचे रोजगार गेले आहेत. काम नाही. पण या वेळेचा सदुपयोग आणि संकटकाळात गोरगरीब कुटुंबियांना मदत म्हणून आम्ही घोडपदेव बेरोजगार प्रतिष्ठानची स्थापना केली. त्यामार्फत आम्ही”ना नफा ना तोटा” तत्वावर धान्य आणि पाले भाजी विक्री सुरू केली आहे. त्याला नागरीकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– ऋषिकेश गोलतकर, घोडपदेव बेरोजगार प्रतिष्ठान.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -