दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेसाठी राज्य मंडळाकडून हेल्पलाईन सुरू

फेरपरीक्षेसंदर्भात विद्यार्थी व पालकांना आकस्मिकपणे काही अडचणी आल्यास त्या दूर करण्यासाठी राज्य मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाकडून १९ नोव्हेंबरपासून विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहे.

दहावी, बारावीच्या मार्च २०२० च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची संधी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये फेरपरीक्षा घेण्यात येत आहे. या फेरपरीक्षेसंदर्भात विद्यार्थी व पालकांना आकस्मिकपणे काही अडचणी आल्यास त्या दूर करण्यासाठी राज्य मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाकडून १९ नोव्हेंबरपासून विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना येणार्‍या समस्या निराकरण करण्यास मदत होणार आहे.

परीक्षांच्या कालावधीत जे विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक तणाव व दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी तसेच विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर ऑनलाईन बहिर्गत समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सहज मदत उपलब्ध व्हावी यासाठी राज्य मंडळाच्या कार्यालयात १९ नोव्हेंबरपासून हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई विभागीय मंडळाच्या हेल्पलाईनचे दूरध्वनी क्रमांक २७८८१०७५/२७८९३७५६ असे आहेत. ही हेल्पलाईन सेवा १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये होणार्‍या इयत्ता १० व १२ वीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास त्यांना हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मार्गदर्शन व मदत घेता येणार आहे. त्याचप्रमाणे हेल्पलाईनवर समुपदेशकांचे मार्गदर्शनही उपलब्ध होणार असल्याने जे विद्यार्थी किंवा पालक समुपदेशकांशी संपर्क साधू इच्छितात त्यांनाही हेल्पलाईन क्रमांकावर समुपदेशाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

विद्यार्थी व पालक यांनी परीक्षेच्या संदर्भात परीक्षा केंद्र, बैठक व्यस्था, वेळापत्रक, हॉलतिकिट तसेच प्रश्नपत्रिकेशी संबंधित प्रश्न इत्यादीबाबत बहिर्गत समुपदेशकांना विचारणा करू नये. मात्र यासंबंधात काही शंका असल्यास मुंबई विभागीय मंडळ कार्यालयाच्या हेल्पलाईन दूरध्वनी क्रमाकांवर विचारणा करावी, अशी माहिती राज्य मंडळाचे मुंबई विभागीय सचिव संदीप संगवे यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

समुपदेशकांचे नाव व दूरध्वनी क्रमांक

अशोक सरोदे – ९३२२५२७०७६, एस. एन. शिपूरकर ९८१९०१६२७०, व्ही. एन. जाधव ९८६७८७४६२३, बि.के. हयाळिज ९४२३९४७२६६, श्रीकांत शिनगारे ९८६९६३४७६५, स्नेहा चव्हाण ७५०६३०२३५३, अखलाक शेख ९९६७३२९३७०, अनिलकुमार गाढे ९९६९०३८०२०, चंद्रकांत मुंढ ८१६९६९९२०४, शैलजा मुळये ९८२०६४६११५ यांच्याशी संपर्क साधावा.


हेही वाचा – वाहतूक कोंडीने मुंबईकर हैराण; अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी लागतात दोन तास