घरमुंबईपोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार हेमंत नगराळेंकडे

पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार हेमंत नगराळेंकडे

Subscribe

हेमंत नगराळे यांच्याकडे महासंचालक (कायदा आणि तांत्रिक) अशी जबाबदारी असतानाच आता पोलिस महासंचाक (डीजी) पदासाठीचा अतिरिक्त चार्जही त्यांच्याकडे देण्यात आला आहे. राज्याचे मावळते डीजी सुबोध जयस्वाल यांनी सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ) पदी बदली मागून घेतल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. डीजी पदासाठी महाविकास आघाडीकडून सध्या फायरब्रॅंड अशा अधिकाऱ्याचा शोध सुरू आहे. तोपर्यंतचा डीजी हे महत्वाचे पद रिक्त राहू नये म्हणून हेमंत नगराळे यांच्याकडे या पदाचा तात्पुरता चार्ज देण्यात आला आहे. महासंचालक पद आठवड्यानंतरही पूर्णवेळ भरण्यात आलेले नाही. वाद टाळण्यासाठी तात्पुरता पदभार नगराळे यांच्याकडे देण्यात आल्याची चर्चा आहे. सर्वात ज्येष्ठ संजय पांडे यांना डावलून नगराळे यांच्याकडे पदभार दिल्याने आता या विषयावर एकच चर्चा सुरू झाली आहे.

सुबोध जयस्वाल हे सप्टेंबर २०२२ रोजी निवृत्त होणार होते. पण त्याआधीच त्यांनी ऑक्टोबर अखेरीस अर्ज केला होता. दोन महिन्यांनी त्यावर केंद्राने निर्णय घेत जयस्वाल यांची प्रतिनियुक्ती सीआयएसएफ येथे केली. त्यामुळेच आता या पदासाठीची जागा पाहता नगराळे यांच्याकडे ताप्तुरती जबाबदारी देण्यात आली आहे.

- Advertisement -

संजय पांडे १९८६ च्या बॅचचे असून सर्वात जेष्ठ अधिकारी आहेत. तर हेमंत नगराळे हे १९८७ बॅचचे अधिकारी आहे. डीजी पदासाठी केंद्राची मंजुरी मिळाली नसल्याने ही अतिरिक्त जबाबदारी हेमंत नगराळे यांच्याकडे देण्यात आली आहे. संजय पांडे यांच्या निवृत्तीला सहा महिन्यांचा कालावधी राहिला असल्यानेच त्यांना डावलले असल्याची चर्चा आहे. १९८७ च्या बॅचच्या अधिकाऱ्यांमध्ये तुरूंग विभागाचे संचालक एस एन पांडे हेदेखील डी जी पदाच्या स्पर्धेत आहेत.

DG letter

- Advertisement -

कोण कोण आहेत स्पर्धेत ?

सेवा जेष्ठतेनुसार सर्वात आधी क्रमांक लागतो तो म्हणजे आयपीएस अधिकारी असलेल्या संजय पांडे यांचा. संजय पांडे हे १९८६ बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. तर महाराष्ट्र स्टेट पोलिस हाऊसिंग एण्ड वेल्फेअर कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष असलेले बिपीन बिहारी हेदेखील या स्पर्धेत आहेत. तर तुरूंग विभागाचे महासंचालक एस एन पांडे हेदेखील स्पर्धेत आहेत. हे दोघेही १९८७ बॅचचे अधिकारी आहेत. हेमंत नगराळे हेदेखील १९८७ बॅचचे अधिकारी असून हे नावदेखील सध्या चर्चेत आहे. मुंबई पोलिस आयुक्त असलेले १९८८ बॅचचे परमबीर सिंह हेदेखील चर्चेतले नाव आहे. तर १९८८ बॅचच्या रश्मी शुक्लाही या पदाच्या दावेदार मानल्या जात आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -