Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी भाजपला शिवसेनेकडून छुपी मदत; काँग्रेसचा आरोप

मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी भाजपला शिवसेनेकडून छुपी मदत; काँग्रेसचा आरोप

पालिका विरोधी पक्ष नेते रवी राजा यांचा गंभीर आरोप  पालिकेत महाविकास आघाडीत बिघाडी

Related Story

- Advertisement -

राज्यात सत्तेत एकत्रित असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिघाडी झाली आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वादाच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत. पालिका विरोधी पक्षनेतेपद भाजपला मिळावे यासाठी शिवसेना भाजपला छुपी मदत करीत असल्याचा गंभीर आरोप पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. मात्र शिवसेनेचे उपनेते आणि पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, रवी राजा यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

काँग्रेसचे नेते आणि मुंबई महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केल्यानंतर यशवंत जाधव यांनी प्रतिक्रिया देताना रवी राजा यांना शिवसेनेमुळेच विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. हे त्यांनी विसरू नये, असं म्हटलं आहे. शिवाय, रवी राजा यांचे आरोप देखील फेटाळले आहेत. पुढे बोलताना, यशवंत जाधव यांनी शिवसेनेबाबत धमकीवजा भाषा वापरू नये. शिवसेना अशा धमक्यांना घाबरत नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं, असं म्हटलं. गेल्या तीन वर्षात ते असे कधी बोलले नाहीत. मात्र आज ते असे का बोलतात हे माहीत नाही. मात्र त्यामुळे महाविकास आघाडीवर काही विपरीत परिणाम होतील असे वाटत नाही. आमच्यात जे काही छोटे-मोठे मतभेद असतील तर ते एकत्र बसून सोडवले जातील, असं यशवंत जाधव यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेच्या पाठोपाठ भाजपकडे सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे भाजपने विरोधी पक्षनेते पदावर आपला दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी अगोदर पालिकेत लढा दिला मात्र अपेक्षित निर्णय न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या विरोधी पक्षनेते पदाबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हाच धागा पकडत रवी राजा यांनी, शिवसेना विरोधी पक्षनेतेपद भाजपला मिळावे यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत छुपी मदत करीत असल्याचा आरोप केला आहे. मात्र स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी रवी राजा यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

 

- Advertisement -