घरमुंबईमुंबईच्या लाईफलाईनवर दहशतवादाचे सावट; हायअलर्ट जारी

मुंबईच्या लाईफलाईनवर दहशतवादाचे सावट; हायअलर्ट जारी

Subscribe

लष्तर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी समुद्रीमार्गे मुंबईत घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई समुद्रकिनाऱ्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईच्या लाईफलाईनवर दहशतवादी हल्ला होण्याची भिती आहे. मुंबईतल्या लोकल रेल्वे स्टेशनवर पुढच्या तीन महिन्यामध्ये दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करत रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी समुद्रामार्गे मुंबईत घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई समुद्रकिनाऱ्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. ऐवढेच नाही संपूर्ण महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

रेल्वे पोलिसांना सतर्कतेचा इशारा

दहशतवादी हल्ल्याबाबत गुप्तचर संघटनेने माहिती दिल्यानंतर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बुधवारी सुरक्षाव्यवस्था कडक करण्याचे आदेश दिले. सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यासोबतच संशयास्पद व्यक्ती आढळली तर त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, रेल्वे स्टेशनसह लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये मोहीम हाती घ्या अशा सूचना देण्यात रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसंच, रेल्वे स्थानकावर अचानक तपासणी, सीसीटीव्ही चित्रणावर नजर, स्थानकावर मॉकड्रिल करण्याच्या सूचना केल्या आहेत. लांबपल्ल्याच्या गाड्या विशेषता दिल्लीकडून येणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमध्ये बॉम्बशोधक पथकाद्वारे आणि श्वान पथकाद्वारे तपासणी करण्याचे आदेश आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -