घरमुंबईउच्च शिक्षणाचा नव्याने विचार आवश्यक

उच्च शिक्षणाचा नव्याने विचार आवश्यक

Subscribe

उच्च शिक्षणाच्या कार्यशाळेत शिक्षणतज्ज्ञांचे मत

शैक्षणिक संस्थांनी फलनिष्पत्तीवर आधारित उपक्रम विकसित करण्याची आवश्यकता, यावर या कार्यक्रमामध्ये उहापोह करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या रोजगारयोग्यता आणि नॅक रँकिंगच्या निकषांमध्ये नुकतेच करण्यात आलेले बदल, यावर लक्ष देणे गरजेचे असून उच्च शिक्षणाच्या नव्याने विचार करणे आवश्यक असल्याचे मत मुंबईसह देशभरातील शिक्षणतज्ज्ञांकडून वर्तविण्यात आले चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्ती व उद्योगातील तज्ज्ञ सहभागी झाले होते.

स्कूलगुरू एड्युसर्व्ह या भारतातील आघाडीच्या तंत्रज्ञान-प्रणित लर्निंग सर्व्हिस कंपनीने इंडिया एज्युकेशन फोरमच्या सहयोगाने मुंबईमध्ये शुक्रवारी युनिव्हर्सिटी 4.0. या संवादात्मक चर्चेचे आयोजन केले होते. शैक्षणिक संस्थांनी फलनिष्पत्तीवर आधारित उपक्रम विकसित करण्याची आवश्यकता, यावर या कार्यक्रमामध्ये उहापोह करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या रोजगारयोग्यता आणि नॅक रँकिंगच्या निकषांमध्ये नुकतेच करण्यात आलेले बदल, यावर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्ती व उद्योगातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. ज्यात एस.एन.डी.टीच्या माजी कुलगुरु आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे सदस्य प्रा. वसुधा कामत, एसआयटीचे डॉ. एस. एस. मंथा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

या उपक्रमाविषयी बोलताना, स्कूलगुरूचे संस्थापक शंतनु रूज यांनी सांगितले, भारतातील उच्च शिक्षणाचा नव्याने विचार करणे आवश्यक आहे. शिक्षणपद्धतीच्या केंद्रस्थानी विद्यार्थी असणे गरजेचे आहे. शिक्षणाची उपलब्धता व समानता साध्य करण्याबरोबरच, शिक्षणामध्ये रोजगारयोग्यता सुधारण्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. या बदलांवर चर्चा करण्यासाठी आणि उच्च शिक्षण संस्थांमधील रोजगारयोग्यता हा घटक वाढवण्यास उपाय सुचवण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील विचारवंतांना एकत्र आणण्याच्या हेतूने आम्हाला या कार्यक्रमाद्वारे व्यासपीठ निर्माण करायचे होते.तर प्लेसमेंटची संधी उपलब्ध केली जाईल, कामाशी संबंधित शिक्षणाच्या संधी निर्माण केल्या जातील, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग दिले जाईल, करिअरबाबत मार्गदर्शन केले जाईल आणि रोजगारयोग्यतेशी संबंधित अतिरिक्त व को-करिक्युलर उपक्रमांचे आयोजन केले जाईल, यावर उच्च शिक्षण संस्थांनी भर द्यायला हवा, असे शंतनू यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -