हिजाबची याचिका न्यायालयाने फेटाळली

hijab
(फोटो प्रातिनिधिक आहे)

आपल्या धर्मात असलेल्या परंपरेप्रमाणे हिजाब परिधान करीत असल्याने आपणास वर्गात बसू दिले जात नव्हते ज्यामुळे मेडिकलच्या परीक्षेस कमी उपस्थितीचे कारण देत बसू दिले गेले नाही, असा आरोप करीत मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणाèया फकिहा बदामी या विद्यार्थिनीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

मुंबईतील बांद्रा परिसरात राहणाऱ्या आणि भिवंडी शहरातील साई हिमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीनीने ही याचिका दाखल केली होती. ज्यावर आज सुनावणी करीत कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. २०१७ मध्ये हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले असता कॉलेज प्रशासनाने सदर विद्यार्थिनीचे रिपिट लेक्चर मार्च २०१८ मध्ये घेतले जातील, अशी माहिती दिली होती. मात्र या विद्यार्थिनीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या अधिकच्या तासांत केवळ ६ दिवस हजेरी लावली असल्याने तिला कॉलेज प्रशासनाकडून परीक्षेस बसू देण्यात आले नाही.
दरम्यान, भिवंडीतील साई होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांना हिजाब परिधान केल्यास लेक्चरला बसू दिले जात नाही असा आरोप या विद्यार्थिनीने केला होता. मात्र या संदर्भात कुठलाही पुरावा समोर आलेला नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here