घरमुंबईएसटी झाली हायटेक !

एसटी झाली हायटेक !

Subscribe

- नव्या प्रणालीचे उद्घाटन ,- कर्मचार्‍यांच्या शिक्षेत बदल

राज्यात सर्वदूर पोहोचलेली राज्य परिवहन महामंडळाची एसटी अखेर हायटेक झाली आहे. मंगळवारी एसटीच्या ‘वाहन शोध व प्रवाशी माहिती’ प्रणालीचे उद्घाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रणालीचे उद्घाटन करताना फायदा प्रवाशांना कसा होईल यासाठी या पुढेही असेच प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. तर एसटीच्या कर्मचार्‍यांमध्ये आणखी शिस्त आणण्यासाठी त्यांना देण्यात येणार्‍या शिक्षेत बदल करण्यात येईल, असे रावते यांनी सांगितले.

कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई न करता तीन दिवसांची बिनपगारी रजा देण्याची सूचना करण्यात आली आहे. लवकरच त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, लवकरच या नवीन प्रणालीचे मोबाईल अ‍ॅप्सदेखील प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

- Advertisement -

राज्य परिवहन मंडळाच्या सुमारे 18 हजार बसेससाठी वाहन शोध आणि प्रवाशी माहिती प्रणालीचे उद्घाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याहस्ते मंत्रालयात पार पडले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. या योजनेअंतर्गत प्रवाशांना एसटीची नेमकी वेळ समजणार असून यासाठी पाच वर्षांसाठी एकूण 32 कोटी 55 हजार रुपयांचा करार करण्यात आला आहेत. या योजनेनुसार एसटी कोणत्या मार्गे जाणार आहे, याची माहितीदेखील प्रवाशांना कळणार आहे. सध्या या योजनेनुसार बस स्थनाकावर एलसीडी टीव्हीवर गाड्यांची प्रत्यक्ष येण्याची वेळ आणि सुटण्याची वेळ कळणार आहे. त्याच बरोबर एखादी एसटी उशिरा आल्यास तिचीदेखील माहिती मिळणार आहे. सध्या हा प्रकल्प मुंबई, पुणे आणि नाशिक या डेपोंमध्ये सुरू करण्यात आला असून आगामी सहा महिन्यात इतर सर्व डेपोंमध्ये ही प्रणाली सुरु करण्यात येणार आहे.

या प्रणालीमुळे एसटी चालकांच्या अतिवेगाला आळा बसणार आहे. या प्रणालीमुळे एसटीने किती वेळेत आपला प्रवास पूर्ण केला हे समजणार आहे. त्यामुळे चालकांनी एखादा मार्ग बदलला किंवा कोणत्या स्थानकावर गाडी थांबवली नाही, तर त्याची माहिती कंट्रोल रूमला तातडीने कळणार आहे. या प्रणालीचे मोबाईल अ‍ॅप्स येत्या सहा महिन्यात सुरू होणार असून सध्या या अ‍ॅप्सची तपासणी सुरु आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. गुजरातनंतर महाराष्ट्र हे अशी प्रणाली सुरू करणारे दुसरे राज्य ठरले आहे.

- Advertisement -

लवकरच सगळ्या आगारांमध्ये सोलर पॅनल
तोट्यात असलेल्या एसटीचा खर्च कमी करण्यासाठी एसटीने काही महिन्यापूर्वी मुख्यालयात सोलर पॅनल लावले होते. यामुळे एसटीच्या विजेचा खर्च सुमारे 10 ते 12 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे एसटीला बराच फायदा झाला आहे. किंबहुना म्हणून येत्या काळात एसटीच्या राज्यातील सर्व आगारात सोलर पॅनल बसविण्यात येणार असल्याची घोषणा दिवाकर रावते यांनी केली. तर यातून निर्माण होणारी अतिरिक्त वीज महावितरणला देण्याचा विचार सुरु आहे. या निर्णयातून एसटीला नफा नाही, पण तोटा कमी करण्यास मदत करणार असल्याचे रावते यांनी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -