घरमुंबईगणेशोत्सवापूर्वी सेना - मनसेमध्ये 'वादाचे ढोल'!

गणेशोत्सवापूर्वी सेना – मनसेमध्ये ‘वादाचे ढोल’!

Subscribe

गणेशोत्सवापूर्वी शिवसेना आणि मनसेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेच्या होर्डिंग्जला मनसेने प्रत्युत्तर दिले आहे.

गणेशोत्सावरून शिवसेना आणि मनसे आता पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकले आहेत. शिवसेनेने शिवाजी पार्कात लावलेल्या होर्डिंग्जला मनसेने देखील होर्डिंग्जने उत्तर दिल्याने सेना-मनसेत होर्डिंग्ज वॉर रंगले आहे. ‘अयोध्येमध्ये जाऊन मंदिर जरूर बांधा. पण त्यापूर्वी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप बांधायला परवानगी द्या’, अशा शब्दांत मनसेने शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सव काळात शिवसेना आणि मनसेमध्ये ‘वादाचा ढोल’ वाजणार हे नक्की!

काय आहे वाद?

सामनातून शिवसेनेने भाजपला राम मंदिराच्या मुद्यावरून अंगावर घेतले. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला वाराणसीला जाऊन गंगापूजन करायचे आहे. ‘अयोध्येमध्ये जाऊन रामलल्लाचे दर्शन घ्यायचे आहे’, अशी घोषणा केली. त्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ‘चलो अयोध्या….चलो वाराणसी‘चे होर्डिंग्ज मातोश्री आणि शिवसेना भवन परिसरामध्ये लावले. त्यावरून आता मनसेने थेट शिवसेनेला लक्ष्य केले आहे. ‘अयोध्येला जाऊन राम मंदिर जरूर बांधा. पण, त्याआधी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप बांधायला परवानगी द्या’ असे होर्डिंग्ज मनसेने शिवाजी पार्क परिसरामध्ये लावले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात शिवसेना आणि मनसेमध्ये आता नवीन वादाची ठिणगी पडली आहे.

- Advertisement -

वाचा – उद्धव ठाकरेंची चलो वाराणसी,चलो अयोध्याची घोषणा!!

गणेशोत्सव काळात मुंबईमध्ये अनेक मंडळं गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. यावेळी मंडळांना पालिकेकडून नियमावली आखून देण्यात आली आहे. या नियमावलीवरून गणेश मंडळांमध्ये नाराजी आहे. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गिरगावला जात गणेशमंडळांच्या कामाची देखील पाहणी केली. यावेळी त्यांनी ‘हिंदुंच्याच सणांना बंधनं का?’ असा सवाल केला. शिवाय ‘तुम्ही दणक्यात गणेशोत्सव साजरा करा’ असे आवाहन देखील गणेश मंडळांना केले. त्यावरून आता शिवसेना आणि मनसेमध्ये वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

पालिकेचे गणेश मंडळांसाठीचे नियम

१ ) मंडपाच्या बाजूला १० फूट जागा सोडावी. जेणेकरून अग्निशमन दल, पादचारी, रुग्णवाहिका यांना कोणताही त्रास होणार नाही
२ ) मंडपासाठी पालिका, पोलीस, वाहतूक विभाग आणि अग्निशमन दलाची परवानगी घेणे आवश्यक
३ ) मंडपामध्ये फायर रेझिस्टंट सिस्टीम आवश्यक
४ ) गाड्यांच्या पार्किंगसाठी १०० मीटर दूर जागा असावी
५ ) मंडपाबाहेर मंडपाच्या नकाशाचा आराखडा असावा
६ ) मंडपासाठी खणलेले खड्डे १० दिवसांमध्ये बुजवावेत. त्याचे फोटो पालिकेला पाठवावेत

गणेश मंडळांच्या मागण्या

१ ) सायलेन्स झोनमधील गणेश मंडळांना लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी द्यावी.
२ ) गणेशोत्सवासाठी १० दिवस लाऊड स्पीकरची रात्री १२ पर्यंत परवानगी द्यावी.
३ ) मुंबईमध्ये सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. त्या ठिकाणावरून मिरवणुकीसाठी पर्यायी रस्ता द्यावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -