घरताज्या घडामोडीपूर्ण मुंबईसाठी नाईट लाईफ अशक्यच, २२ तारखेला निर्णय घेऊ - गृहमंत्री

पूर्ण मुंबईसाठी नाईट लाईफ अशक्यच, २२ तारखेला निर्णय घेऊ – गृहमंत्री

Subscribe

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत २४ तास हॉटेल, मॉल चालू राहू शकतात असं सांगत मुंबईतल्या नाईट लाईफविषयी केलेली घोषणा राज्याच्या गृहमंत्र्यांना मात्र पटलेली नाही. या निर्णयाला त्यांनी विरोध केला आहे.

शिवसेनेचे युवराज आणि राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या नाईट लाईफविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. येत्या २६ जानेवारीपासून मुंबईत २४ तास हॉटेल, मॉल सुरू राहू शकतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. मात्र, त्यानंतर लगेचच गृहमंत्र्यांनी मुंबईत नाईट लाईफ सुरू करण्यासाठी असमर्थता दर्शवली. आता ‘संपूर्ण मुंबईत नाईट लाईफ अशक्य आहे’, असं विधान करून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आदित्य ठाकरेंच्या महत्त्वाकांक्षी घोषणेमधली हवाच काढून घेतली आहे. ‘येत्या २२ तारखेला यासंदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर आल्यानंतर त्याबाबत निर्णय जाहीर केला जाईल’, असं गृहमंत्री यावेळी म्हणाले.

काय म्हणाले गृहमंत्री?

सोमवारी पत्रकारांशी बोलताना अनिल देशमुख यांनी याविषयी भूमिका मांडली आहे. ‘संपूर्ण मुंबईसाठी नाईट लाईफ शक्य नाही. मुंबईतल्या काही जागांसाठी जर प्रस्ताव असेल, तर लिमिटेड जागांसाठी त्याचा विचार करता येईल. संपूर्ण मुंबईत जर नाईट लाईफचा विचार असेल, तर त्याचा ताण फार मोठ्या प्रमाणावर येईल. त्यामुळे येत्या बुधवारी त्यासंदर्भातला प्रस्ताव आल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय देऊ’, असं गृहमंत्री म्हणाले.

- Advertisement -

वाचा सविस्तर – आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाच्या अंमलबजावणीला गृहमंत्र्यांची असमर्थता!

संपूर्ण मुंबईत नाईट लाईफ अशक्य – गृहमंत्री

संपूर्ण मुंबईत नाईट लाईफ अशक्य – गृहमंत्री

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಜನವರಿ 20, 2020

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -