घरमुंबईकल्याण- डोंबिवलीमध्ये परवडणार्‍या किमतीत हक्काचे घर !!

कल्याण- डोंबिवलीमध्ये परवडणार्‍या किमतीत हक्काचे घर !!

Subscribe

तुमच्या स्वप्नातील घर २५ ते ३० लाखात, तेदेखील डोंबिवलीमध्ये !! विश्वास नाही बसत का? पण, हो १ बीएचके प्लॅट आता २५ ते ३० लाखांत उपलब्ध होणार आहेत. बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या एमसीएचआय क्रेडाईच्या कल्याण डोंबिवली युनिटच्या वतीने २४ ते २७ जानेवारी दरम्यान प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिम येथील लालचौकी फडके मैदान येथे तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर पहायला मिळणार आहे. एमसीएचआयचे अध्यक्ष रवी पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

प्रदर्शनाचे यंदाचे आठवे वर्ष आहे. मुंबई, ठाण्यानंतर आता कल्याण, डोंबिवलीमध्ये हक्काच्या घरासाठी पसंती दिली जात आहे. शिवाय, आता कल्याण – डोंबिवलीचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्याने आगामी काळात शहरांचा विकासदेखील वेगाने होणार आहे. या सार्‍या बाबींचा विचार करता ग्राहकांना कमीत कमी किमतीमध्ये अधिक चांगली घरे देण्याचा प्रयत्न असल्याचेदेखील पाटील यांनी सांगितले. प्रॉपर्टी प्रदर्शनामध्ये फ्लॅट बुक करणार्‍या ग्राहकांसाठी बक्षिसाचीदेखील तरतूद करण्यात आली आहे. कार, टू व्हिलर अशाप्रकारची बक्षिसे ग्राहकांना दिली जाणार आहेत. २०१७ साली झालेल्या प्रदर्शनाला २५ हजार लोकांनी भेट दिली होती. त्यापैकी ८ हजार लोकांनी घरांची बुकिंग केली होती. तर, १२५ स्पॉट बुकिंग झाल्या होत्या. यंदा हा आकडा वाढेल, अशी आशा प्रॉपर्टी एक्स्पोचे चेअरमन मिलिंद चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

पूर्वी फारसे महत्त्व नसलेले डोंबिवली आता मुंबईच्या नागरिकांसाठी आता एक नवीन पर्याय म्हणून समोर येत आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डोंबिवलीमध्ये राहणार्‍या लोकांचा वर्ग उच्च समजला जातो. डोंबिवली शहराची झालेली अविश्वसनीय वाढ आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्राचा विकास आणि मुंबईशी जोडले गेलेले नाते यापूर्वी कधीही पहायला मिळालेले नाही. रोजगार आणि स्टार्ट – अप बिझनेसकरिता डोंबिवली हे महत्त्वाचे केंद्र समजले जाते. त्याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहराला दिलेली मेट्रो रेल्वेची अभूतपूर्व भेट आणि सध्याचा ४ लेनचा असलेला शिळ फाटा आता ६ लेनचा करण्यात येणार आहे. तसेच, पीएमएव्हायच्या अंतर्गत सर्वांना परवडणार्‍या घरकुलाची योजना सुरू करण्यात आली असून, यासर्व सोयीसुविधा आता उपलब्ध होत असल्याने डोंबिवली हे शहर मध्य उपनगरांमधील टायर १ च्या श्रेणीमध्ये आले आहे.                                                  -महेश अगरवाल, सीएमडी, रिजन्सी ग्रूप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -