घरCORONA UPDATEखासगी रुग्णायलचा प्रताप; कोविड रिपोर्ट निगेटिव्ह, तरिही पैशांसाठी सांगितले पॉझिटिव्ह

खासगी रुग्णायलचा प्रताप; कोविड रिपोर्ट निगेटिव्ह, तरिही पैशांसाठी सांगितले पॉझिटिव्ह

Subscribe

कल्याणातील एका खासगी रूग्णालयाच्या गैरकारभारामुळे कोविड रिपोर्ट निगेटिव्ह असणाऱ्या महिलेस कोविड पॉझिटिव्ह असल्याचे सांगून कोविड उपचार सुरू करुन रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. तर या प्रकारानंतर दोन खासगी हॉस्पिटल आणि लॅबने एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी झटकली आहे. याप्रकरणी दोषी असलेल्या या दोन हॉस्पिटल आणि लॅब विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी या रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी येथे राहणारे अजय सावंत यांची बहीण नीता सावंत हिला बरे वाटत नसल्याने ३ जुलै रोजी सिटी क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ४ जुलै रोजी कोविड चाचणी करण्यात आली. ५ जुलै रोजी कोविड चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सागंत रूग्ण नीताला तात्काळ कल्याण पश्चिमेतील ए अँन्ड जी या कोविड रूग्णालयात नेण्यास सांगितले. त्याप्रमाणे नीताला ए अँन्ड जी रूग्णालयात दाखल केले. तेथे ४५ हजार किंमतीचे इंजेक्शन आणण्यासाठी सांगितले. कल्याणात इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने मोठ्या कसरतीने मुंबई हुन आणले. ते इंजेक्शन नीता हिस् दिल्यानंतर ३५ हजार किमंतीचे ६ इंजेक्शन आणण्यास सांगितले. ते देखील मोठी तारेवरची कसरत करून आणले.

- Advertisement -

यानंतर रूग्णालयाने पुन्हा ४५ हजार वाले इंजेक्शन आणण्यास सांगितले ते आणण्यासाठी मेडिकल वाल्याने कोविड रिपोर्ट लागत असल्याने ए अँन्ड जी या रुग्णालयाकडुन झेरोक्स दिली गेली असता झेरॉक्स ची प्रत पाहता मेडिकल वाल्याने हा रिपोर्ट अजय यांची बहीण नीता हिचा नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तो रिपोर्ट नीता सावंत नामक ४५वर्षी य दुसऱ्या महिलेचा असल्याने अजय सावंत यांची बहीण नीता हिस प्लेटलेट कमी असल्याच्या उपचारार्थ मीरा रुग्णालयात दाखल केले असुन त्यांची प्रकुती स्थिर आहे.

कोविड उपचारला सामोरे नेणार्या कोविड चाचणी करणारी इंफेक्स्न लँब्, सिटी क्रिटीकेअर हाँस्पिटल, आणि ए अँन्ड जी हाँस्पिटल मुळे रूग्णांच्या जिवाशी खेळणारा प्रकार, हा आर्थिक फायद्यासाठी व पैशाच्या हव्यासापोटी करीत रुग्णाची फसवणूक, मनस्ताप केला गेल्याने फसवेगिरी करणाऱ्या वर फौजदारी गुन्हा दाखल करीत इंफेक्स्न लँब्, सिटी क्रिटीकेअर हाँस्पिटल, ए अँन्ड जी हाँस्पिटल यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी अजय सावंत यांनी आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य, क.डो.म.पा.आयुक्त, पोलीस आयुक्त ठाणे, पोलीस उप आयुक्त, वैघकीय आधिकारी क.डो.म.पा. यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

तर सिटी क्रिटिकेयर रुग्णालय प्रशासनाने मात्र आम्हि त्यांच्यांवर योग्य ते उपचार केले त्यानंतर लॅब कडून आलेल्या रिपोर्टनुसार त्यांना उपचारा साठी कोव्हिडं रुग्णालयात पाठवले असे सांगितले. “अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याशी संपर्क साधला असता निवेदन प्राप्त झाले असुन योग्य ती शहानिशा, कार्यवाही बाबत आरोग्य विभागाकडे पाठविले असल्याचे सांगितले.”

“पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकरी डॉ प्रतिभा पानपाटील यांनी या प्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून शहानिशा करून कारवाई करू”, अशी प्रतिक्रिया दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -