घरमुंबईसरकारी १०८ मोफत रुग्णवाहिकेसाठी पैशांची मागणी

सरकारी १०८ मोफत रुग्णवाहिकेसाठी पैशांची मागणी

Subscribe

कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची लुबाडणूक

ग्रामीण व डोंगराळ भागात आरोग्य सेवा मोफत व तात्काळ पुरवण्यासाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली, मात्र आता याच आरोग्यसेवेच्या रुग्णवाहिकेचे चाक भष्टाचाराच्या गाळात रुतले आहे. पंचायत समिती खेड येथे घेण्यात आलेल्या जिल्हा आरोग्य विभागाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. १०८ क्रमांकावरून रुणवाहिका सेवा देणाऱ्या चालकांकडून नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे मागितले जात असल्याचा आरोप आहे.

या रुग्णवाहिकेच्या मदतीने ग्रामीण भागात प्राथमिक उपचार, आरोग्य सेवा, गर्भवती माता अथवा अपघातग्रस्त त्यांना असेल तेथून तात्काळ जवळच्या रुग्णालयात पोहोचविले जाते. शिवाय या रुग्णवाहिकेत चालकासोबत तज्ज्ञ डॉक्टर असतात. महिलांची प्रसूती सुखरूप व्हावी व शेकडो अपघातग्रस्तांचे प्राण वाचावे यासाठी ही रूग्णसेवा सुरू करण्यात आली आहे.
मात्र बरेचदा १०८ क्रमांकाशी संपर्क साधल्यावर, आमच्याकडे वाहन नाही, वाहन असले तर चालक नाही, ती आमची हद्द नाही, अशी जुजबी कारणे देत सेवा नाकारली जाते. खेड तालुक्यात ग्रामीण व डोंगराळ भागात अपघात, सर्पदंश, विंचूदंशाच्या घटना घडतात. त्यावेळी रुग्णाला तातडीने उपचाराची गरज असते. तसेच गर्भवतींना योग्य आणि तत्काळ उपचार मिळावेत यासाठी शासनाने ग्रामीण रुग्णालये सुरू केली आहेत. मात्र रुग्णालयात रुग्ण पोहचवण्याची सेवा पुरवली जात असताना पैशांची मागणी होत असल्याने रुग्ण हवालदील झाले आहेत.

- Advertisement -

– प्रविण माने, सभापती, आरोग्य विभाग, पुणे जि.प.
आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. शासनाच्या माध्यमातून सेवा मोफत सुरू करण्यात आली आहे. मात्र, जर कोणीही पैशाची मागणी करत असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -