घरताज्या घडामोडीधारावी पुनर्विकास प्रकल्प तातडीने सुरू करा; आव्हाडांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धारावी पुनर्विकास प्रकल्प तातडीने सुरू करा; आव्हाडांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Subscribe

मुंबईची कोविड कॅपिटल म्हणून धारावीची नवी ओळख प्रस्थापित होत असून सुमार दर्जाच्या आरोग्य व्यवस्थेमुळे धारावीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या अंमलबजावणीस तातडीने सुरुवात करावी आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक बैठक आयोजित करावी अशी आग्रही मागणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात जितेंद्र आव्हाड म्हणतात की, धोरणामुळे जगात देशात आणि राज्यभरात विविध स्थित्यंतरे पाहावयास मिळत आहेत. त्यातील एक प्रमुख स्थित्यंतर हे झोपडपट्टी बहुल भागात दिसून येत आहे. धारावी सारख्या झोपडपट्ट्यांमध्ये कोणत्याही दर्जाच्या आरोग्य व्यवस्था नसल्यामुळे तेथील उपचार यंत्रणा पूर्णता मोडून पडलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये धारावी बद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता धारावीच्या पुनर्विकासासाठी महाविकास आघाडीला चांगली संधी प्राप्त झाली आहे. धारावीच्या पुनर्विकासाची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती .केंद्रापासून ते राज्य पर्यंतच्या सर्व मंजुरी प्रक्रिया पार पडलेल्या आहेत कोरोणाच्या साथ रोगामुळे राज्याचे मुंबईचे अर्थकारण घसरलेले आहे. अशा परिस्थितीत धारावीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला तर महाविकास आघाडीच्या दृष्टीने ते राजकीय सामाजिक आणि आर्थिक विकासाचे होणार आहे त्याशिवाय राजकीय विरोधकांनाही या निर्णयामुळे मोठा दणका देणे शक्य होणार असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे .

- Advertisement -

बांधकाम उद्योग हा असा उद्योग आहे ज्याच्यामध्ये कितीही घसरण झाली तरी बाहेरच्या विश्वातून निधी येतो आणि त्यामुळे ढासळलेला आर्थिक-सामाजिक स्तर उंचावताना नवीन रोजगार निर्मिती देखील करता येते. धारावीत सर्व जाती धर्मात ते लोक वास्तव्यास असून धारावीचा विकास झाल्यास तो महाविकास आघाडी सरकार साठी सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या हितावह ठरणार आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत सर्वमान्यता या प्रकल्पाला या आधीच मिळालेल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत एक बैठक घेऊन त्यामध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिल्यास धारावीच्या पुनर्विकासाला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षाही डॉक्टर आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.


हेही वाचा – Coroanavirus: जगात कोरोनाचा कहर सुरुच; कोरोनाग्रस्तांचा आकडा ५० लाखपार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -