घरमुंबईफटाक्यांमुळे कसा वाढेल कोरोना, डॉ. तात्याराव लहानेंनी केलं स्पष्ट!

फटाक्यांमुळे कसा वाढेल कोरोना, डॉ. तात्याराव लहानेंनी केलं स्पष्ट!

Subscribe

दिवाळीमध्ये फटाके वाजवायचे की नाही? बंदी किती असायला हवी? कोणत्या भागात कोणत्या दिवशी फटाके वाजवायला परवानगी असेल? असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहेत. राज्य सरकारने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन जरी केलेलं असलं, तरी अद्याप अनेकांच्या ते पचनी पडलेलं दिसत नाही. मुंबईत फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच फटाके वाजवण्याची परवानगी मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे. तसेच, कमी आवाजाचे आणि कमी प्रदूषण करणारे फटाकेच वाजवावेत असेही निर्देश पालिकेने दिले आहेत. पण नक्की फटाक्यांमुळे कोरोना कसा बळावू शकतो? याचं उत्तर अनेकांना अद्याप सापडलेलं नाही. या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी फटाके आणि कोविडचा संबंध समजावून सांगितला आहे. मुंबईत झालेल्या एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते.

…म्हणून कोरोना काळात फटाके त्रासदायक!

यावेळी बोलताना डॉ. तात्याराव लहाने यांनी यंदा फटाकेविरहित दिवाळी साजरी करताना शोभेचेही फटाके वाजवू नयेत, असं आवाहन केलं आहे. ‘कोरोना आणि दिवाळीचे फटाके यांचा थेट संबंध आहे. फटाक्यांमध्ये सल्फर असतो. फटाके फुटतात तेव्हा त्यातला सल्फर हवेत जातो. श्वासोच्छवासातून हा सल्फर फुफ्फुसात जातो. त्यातून दम्याचे रुग्ण वाढून कोविड बळावू शकतो’, असं लहाने म्हणाले.

- Advertisement -

आपणच कोरोनाची दुसरी लाट आणतोय!

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट भारतात आली, तर त्यासाठी आपणच कारणीभूत असू, असं देखील डॉ. तात्याराव लहाने यांनी नमूद केलं आहे. ‘गेल्या काही काळापासून मुंबईसह महाराष्ट्रातले कोरोनाचे रुग्ण कमी होताना दिसत आहेत. पण दुसरी लाट आपल्याकडेही येऊ शकते. ती किती सौम्य किंवा तीव्र असेल, ते आपल्या हातात नाही. पण हल्ली अनेकजण मास्क न घालताच बाहेर पडतात. फिजिकल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आणण्याचं काम आपणच करतोय’, असं डॉ. लहानेंनी नमूद केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -