घरटेक-वेकमोबाईल इंटरनेट सेवा १ डिसेंबरपासून होणार महाग; 'ही' आहेत कारणं

मोबाईल इंटरनेट सेवा १ डिसेंबरपासून होणार महाग; ‘ही’ आहेत कारणं

Subscribe

एअरटेल, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलने आपल्या इंटरनेट सेवेचे दर वाढवण्याची घोषणा केली

भारत हा असा देश आहे की या देशात इंटरनेट सेवेचे दर खूप कमी आहेत. भारतात चीन, जपान आणि दक्षिण कोरियापेक्षाही स्वस्तात इंटरनेट सेवा उपलब्ध आहे. मात्र भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने इंटरनेट सेवा महाग झाल्याचा मोठा फटका त्यांना बसणार आहे. कारण एअरटेल, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलने आपल्या इंटरनेट सेवेचे दर वाढवण्याची घोषणा केली आहे.

‘या’कारणाने वाढणार इंटरनेटचे दर

भारतातील एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाची सर्वात जास्त भागीदारी आहे. दोन्ही कंपन्यांनी वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत १० अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांना ९० हजार कोटी रुपये सरकारला द्यावे लागणार आहे, असे सुप्रीम कोर्टाने मागील प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले होते.

- Advertisement -

यानंतर इंटरनेट सेवेला वाढती मागणी आहे. मात्र भारतात त्यामानाने सर्वात स्वस्त मोबाईल डेटा मिळतो. त्यामुळे व्होडाफोन आयडिया १ डिसेंबरपासून आपले टॅरिफचे दर वाढवणार असल्याने इंटरनेट सेवा महागणार आहे.

‘या’ कंपनीकडून करण्यात आली घोषणा

व्होडाफोन आयडिया १ डिसेंबरपासून आपले टॅरिफचे दर वाढवणार असल्याने एअरटेलकडून देखील याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र नवे इंटरनेटचे दर किती असणार याची माहिती अद्याप समोर आली नाही. तसेच जिओ आणि भारत संचार निगम लिमिटेडने यासंदर्भातील घोषणा केली आहे. या वाढत्या दराचा सेवा मात्र असंख्य ग्राहकांना बसणार आहे.


भारतात रॉयल एनफिल्डच्या ‘या’ बाईक्स होणार बंद?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -