घरमुंबईवर्षापूर्वीच अग्निसुरक्षेबाबत केली होती तक्रार - शकील अहमद

वर्षापूर्वीच अग्निसुरक्षेबाबत केली होती तक्रार – शकील अहमद

Subscribe

मुंबईत सतत होणाऱ्या आगीच्या घटनेची दखल घेत सामाजिक कार्यकर्ता शकील अहमद यांनी अधिकार फाऊंडेश संस्थेच्या वतीने महापालिकेला पत्र लिहीले होते. त्यात त्यांनी रुग्णालयात अग्निसुरक्षेबाबत कोणतीही उपाययोजना केली नसल्याचा आरोप १ वर्षापूर्वीच केला होता आणि आज पुन्हा लागलेल्या आगीमुळे मुंबईतील आगीच्या घटनांचा प्रश्न त्यांनी पुन्हा उपस्थित केला आहे.

मुंबईत सतत होणाऱ्या आगीच्या घटनेची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते शकील अहमद यांनी अधिकार फाऊंडेश संस्थेच्या वतीने महापालिकेला पत्र लिहीले होते. मुंबईतील अनेक महापालिकेच्या रुग्णालयामध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा नसल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शकील अहमद यांनी समोर आली होती. मात्र याकडे गांभीर्याने पाहिले गेले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. २ जानेवारी २०१८ रोजी शकील अहमद यांनी अधिकार फाऊंडेश संस्थेच्या वतीने महापालिकेला पत्र लिहीले होते. त्यात त्यांनी रुग्णालयात अग्निसुरक्षेबाबत कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे त्या पत्रात म्हटले होते.

या पत्रात काय लिहिले होते

अधिकार फाऊंडेश संस्थेच्या वतीने महापालिरकेला एक पत्र देण्यात आले होते. त्या पत्रामध्ये मुंबईतील अनेक महापालिकेच्या रुग्णालयात अग्निसुरक्षा नसल्याचे लिहीण्यात आले होते. याबाबत महापालिकेने ठोस पावले उचलून योग्य त्या उपाययोजरना कराव्या असे या पत्रात लिहीण्यात आले होते. त्यासोबतच मुंबईतील अनेक महापालिका वैद्यकीय महाविद्यालय – रुग्णालय, दंत रुग्णालय, प्रसूतिगृह, दवाखान्यात अग्नि सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण आणि अग्निप्रतिबंधक यंत्रणा नसल्याची माहिती समोर आली आहे. याविषयी योग्यती उपायोजना करावी असे या पत्रात सांगण्यात आले होते. मात्र त्या गोष्टीला गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

How safe is Mumbai for Fire? 8328 fire incidents in 10 years

मुंबई आगींने पुन्हा होरपळली

मुंबईत सतत आग लागण्याच्या घटना घडत आहेत. सातत्याने या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. झोपडपट्ट्या, इमारती, व्यावसायिक इमारती या ठिकणी वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. आज पुन्हा एकदा अंधेरी मधील मरोळ या ठिकाणी कामगार रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली. या घटनेमध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सेव्हन हिल्समध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांचा कुपर रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर यामध्ये १०८ जण जखमी झाले असून ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या सतत घडणाऱ्या घटनांमुळे मुंबई आगींने पुन्हा होरपळल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

वाचा – Breaking news : अग्नितांडवात ६ जणांचा मृत्यू; १४७ जण जखमी; ८ जणांची प्रकृती गंभीर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -