घरमुंबईमग अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याची ओरड का? - विनोद तावडे

मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याची ओरड का? – विनोद तावडे

Subscribe

नरेंद्र मोदी यांना मतदान करु नका असे आवाहन करणारे कलाकार त्यांच्या अभिव्यक्ती स्वांतत्र्याची गळचेपी झाल्याची ओरड कशाला करित आहेत, असा रोखठोख सवाल सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे केला.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी, गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये एकाही कलाकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याची एकही घटना घडली नाही. मग नरेंद्र मोदी यांना मतदान करु नका असे आवाहन करणारे कलाकार त्यांच्या अभिव्यक्ती स्वांतत्र्याची गळचेपी झाल्याची ओरड कशाला करित आहेत, असा रोखठोख सवाल उठवला. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते.

देशातील सहाशे कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देऊ नका असे आवाहन करित महागठबंधन केले आहे. २०१४ च्या निवडणूकी वेळीही कलाकारांनी मोदी यांना मते देऊ नका, असे आवाहन केले होते. पण तरीही भाजपाला जास्त मते मिळाली होती हे निर्दशनास आणून देताना तावडे म्हणाले की, पंडित नेहरु यांच्या काळात गीतकार मजरूह सुलतानपूरी यांनी नेहरुंच्या विरोधात काव्य लिहिल्यामुळे मोरारजी देसाई यांनी सुलतानपुरी यांना तुरूंगवास घडवीला होता. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात संपुर्ण देशाचा तुरूंग केला होता.

- Advertisement -

किशोर कुमार यांच्या रेकॉर्डस् आकाशवाणीवर वाजविल्या जाणार नाहीत असा फतवाही तेव्हा काढण्यात आला होता. त्याचप्रमाणे काँग्रेस सरकारच्या काळात शब्दर हाशमी यांना पथनाट्य सादर करताना मृत्यूला सामोरे जावे लागले होते. परंतु गेल्या पाच वर्षात अशी एकही घटना मोदी सरकारच्या काळात घडली नाही. तरीही कलाकार असा विरोध कसा करतात असा सवालही त्यांनी यावेळी केला. यापूर्वी बॉलिवूडच्या कलाकारांकडून खंडणी मागितली जायची, पण गेल्या ५ वर्षाच्या काळात मात्र अशी खंडणीची घटना घडली नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील भाषणात भारताने पाकिस्तानची एफ १६ विमाने पाडली नाहीत. पाकिस्तानमधील एफ १६ विमानाचे ऑडिट करण्यात आल्याचा दावा फॉरेन पॉलिसी या मॅगजिनच्या हवाल्यानुसार दिला होता. परंतु प्रत्यक्षात पेन्टॅगॉनने मात्र याचा स्पष्ट पणे इन्कार केला असून असे कुठलेही ऑडिट झालेले नाही असे स्पष्ट केले होते असे स्पष्ट करताना तावडे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सध्या महाराष्ट्र पीपीटी नवनिर्माण सेना झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

- Advertisement -

गेल्या ४० वर्षाच्या सत्तेच्या काळात शरद पवार यांचे घर पैसाने भरले आहे, पण नरेंद्र मोदी यांची भूमिका ‘न खाता हू और न खाने दूंगा’ अशी असल्यामुळेच मोदी यांचे घर रिकामे आहे. शरद पवार यांचे घर का भरले हे देशाच्या जनेतला माहित आहे. मोदी यांच्या विरुध्द तुम्ही भ्रष्टाचाराचे एकही आरोप करु शकला नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -